Home शहरं मुंबई shivsena dasara melava: शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कसा होणार?; संजय राऊत म्हणाले......

shivsena dasara melava: शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कसा होणार?; संजय राऊत म्हणाले… – shivsena leader, mp sanjay raut comment on shivsena dasara melava


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. शिवाय दसरा मेळाव्याचे महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्यादेखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल आणि नियम तसेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीचे नियोजन केले जाईल, असे सांगताना दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार’, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले.

येत्या २५ ऑक्टोबरला दसरा असून त्यानिमित्ताने होणारा शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचे राऊत यांनी खंडन केले. ‘कुणी सांगितले शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे’, असे सांगत राऊत यांनी सेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले.

बिहारमधील सभांचा अभ्यास

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेणार असल्याचे आजच माझ्या वाचनात आले आहे. साहजिकच त्यांच्या कशाप्रकारे सभा होतात याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही असेही ते म्हणाले.

दोन दिवसांत निर्णय

दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून येत्या एक-दोन दिवसांत त्यावर निर्णय होईल. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Imrati Devi Used Word Item For Kamal nath Mother And Sister, Video Goes Viral – कमलनाथांच्या आई-बहिणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या इमरती देवी व्हायरल

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका महिलेसाठी 'आयटम' हा शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. मध्य प्रदेशातही या...

Raghuram Rajan warn about atmanirbhar bharat: आत्मनिर्भर भारत ; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी टोचले सरकारचे कान – raghuram rajan warn about atmanirbhar bharat...

नवी दिल्ली : करोना संकटात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या महत्वकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. आयात कमी करून जास्तीत जास्त स्थानिक उत्पादनाला चालना देण्याचा...

Amit Thackeray: अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज – amit thackeray gets discharged from lilavati hospital

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप येत...

Recent Comments