Home शहरं मुंबई shivsena lashes devendra fadnavis : 'फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना त्यांचं काम करू द्या'...

shivsena lashes devendra fadnavis : ‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना त्यांचं काम करू द्या’ – shivsena lashes out at opposition leader devendra fadnavis for criticising cm thackeray’s decision on newspaper distribution


मुंबई: वृत्तपत्र वितरणाच्या संदर्भातील निर्णयावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ले देऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे निर्णय घेतले आहेत. आता ठाकरेंना त्यांचं काम करू द्या,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Live: राज्यातील रुग्णसंख्येत प्रथमच मोठी वाढ

राज्य सरकारनं वृत्तपत्रांना लॉकडाऊनमध्ये वगळले आहे. मात्र, घरोघरी वितरणावर निर्बंध घातले आहेत. सरकारच्या या निर्णयाला फडणवीस यांनी विरोध दर्शवला होता. वृत्तपत्रांवरील बंदी उठवा, अशी मागणी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन केली होती. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं वृत्तपत्र सुरक्षित असल्याचं म्हटलं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र ट्रम्प यांनीच जागतिक आरोग्य संघटनेला खोटं ठरवलं आहे. तसंच, या संघटनेचा निधी रोखला आहे. त्यामुळं मुंबईत बसून फडणवीसांनी या संघटनेची ‘तबलिगी’ करू नये,’ असं त्यांना सुनावण्यात आलं आहे. फडणवीस डॉक्टर कधीपासून झाले, असा खोचक सवालही करण्यात आला आहे.

शिक्षक बनले स्वयंपाकी; करोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन

वृत्तपत्रांवरील निर्बंध हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचं राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचं म्हणणं होतं. त्यावरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ‘डॉ. आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी, आरोग्याशी खेळा, लोकांचे बळी घ्या असेही कोठे घटनेच्या कलमात लिहून ठेवल्याचे सापडत नाही,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

करोनाशी लढा: ‘हा’ टॉर्च ठरणार गेमचेंजर?

‘वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध असू नयेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणत्याही प्रकारची मुस्कटदाबी होऊ नये. वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत व्हावे व टिळक, आगरकर, अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शस्त्र तेजाने तळपत राहावे. हे शस्त्र कोणालाही मोडता येणार नाही, ते बोथट होणार नाही, असं शिवसेनेचंही मत आहे. पण करायचे काय? आज काहीच सुरक्षित नाही. मग वितरणवाल्या पोरांना तरी असुरक्षित का करावं,’ असं प्रश्न शिवसेनेनं केला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments