Home महाराष्ट्र shramik train departed: ११८० जणांना घेऊन श्रमिक ट्रेन लखनऊला रवाना - special...

shramik train departed: ११८० जणांना घेऊन श्रमिक ट्रेन लखनऊला रवाना – special train from departed from nagpur to lucknow with 1180 passengers


नागपूरः लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून नागपुरात अडकलेल्या श्रमिकांना घेऊन ट्रेन रविवारी लखनऊकडे रवाना झाली. करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच ट्रेनमध्ये प्रवाशांना बसविण्यात आले आहे. ११८० प्रवाशांना घेऊन निघालेली ही ट्रेन थेट लखनऊला पोहोचणार असून तेथील प्रशासन प्रत्येकाला आपआपल्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करून देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र शासनाने देशात लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनमुळे नागपूर आणि परिसरात आलेले कामगार इथेच अडकून पडले. प्रशासनाने या कामगारांसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या. मात्र आपल्या गावी जाण्याची ओढ या कामगारांमध्ये कायम होती. गावी जाण्यासाठी कुणी पायी तर कुणी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत होते. गेल्या दीड महिन्यांपासून ते अनेक समस्यांना तोंड देत होते. आता आपल्या घरी जाण्यासाठी प्रशासनाने त्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या श्रमिकांना घेऊन जाणारी पहिली ट्रेन रविवारी निघाली तेव्हा त्या सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद होता.

एका कोचमध्ये ४५ श्रमिक

देशात करोनाचे संकट असताना श्रमिकांसाठी पाठविण्यात आलेल्या या विशेष ट्रेनमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. ७२ प्रवाशांची क्षमता असलेल्या एका कोचमध्ये केवळ ४५ प्रवाशांना बसविण्यात आले. साध्या स्लिपर कोचसाठी लागणारे शुल्क या प्रवाशांकडून आकारण्यात आले. नागपूर ते लखनऊ प्रवासासाठी एका व्यक्तीला ५०५ रुपये भरावे लागले. या ट्रेनमुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागातील प्रवाशांना आपल्या गावी जाता आले.

उद्या आणखी सुटेल ट्रेन

नागपुरात हजारो कामगार अडकून आहेत. पहिल्या टप्प्यात ११८० प्रवाशांना पाठविण्यात आले. मंगळवारी किंवा बुधवारी आणखी एक ट्रेन पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१९ हजार कर्मचारी बाकी

लॉकडाउनमुळे सुमारे २० हजार कर्मचारी नागपूर विभागात अडकले आहेत. यापैकी १ हजाच्या घरात रविवारी पाठविण्यात आले. उर्वरित १९ हजार श्रमिक, विद्यार्थी यांना पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील श्रमिक सर्वाधिक आहेत. बिहारला जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करावी लागेल. जवळ असल्याने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला जाण्यासाठी बसची व्यवस्था करता येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad municipal elections 2020: शिवसेनेला अॅलर्ट? हैदराबाद महापालिका निडणुकीसाठी भाजपची फौज, PM मोदीही प्रचारात उतरणार! – amit shah jp nadda to campaign for hyderabad...

हैदराबाद: हैदराबादमध्ये ( hyderabad election ) यावेळी काहीतरी 'अनपेक्षित' पाहायला मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments