Home शहरं अहमदनगर Shukla Gang Exiled: तीन भाऊ ठरले होते संपूर्ण तालुक्याची डोकेदुखी; पोलिसांनी दिला...

Shukla Gang Exiled: तीन भाऊ ठरले होते संपूर्ण तालुक्याची डोकेदुखी; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका – ahmednagar police sent gang of three brothers in exile for three years


म.टा. प्रतिनिधी, नगर

अकोले तालुक्यात संघटित गुन्हे करणारी तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी हा आदेश दिला. संजय, राहुल व विनय अदालतनाथ शुक्ला (रा. राजूर) यांना नगर जिल्ह्यातून आणि नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या लगतच्या भागातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Live: राज्यात आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

गेल्या अनेक वर्षांपासून हे तिघे भाऊ अकोले तालुक्यात विशेषत: राजूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे करीत होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली, तरीही त्यांचा उपद्रव सुरूच होता. मारीमारी करणे, गर्दी जमवून दहशत निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे, अवैधरित्या दारूचा व्यावसाय करणे, चोरी करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे गुन्हे त्यांच्यविरुद्ध दाखल आहेत. टोळीचा प्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला (वय ३०) याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. राहुल अदालतनाथ शुक्ला (वय २५) याच्याविरुद्धही नऊ गुन्हे आहेत. विनय अदालतनाथ शुक्ला याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत.

वाचा: …मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची; आव्हाडांचा सवाल

या टोळीला जरब बसविण्यासाठी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. राजूरचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी त्यासाठी मोठा पाठपुरावा केला. त्यावर सुनावणी घेऊन पोलिस अधीक्षकांनी या टोळीच्या तडीपारीचा आदेश दिला. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. लॉकडाउनच्या काळातही त्यांचा दारूचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. यासंबंधी तक्रारी करणाऱ्यांना ते त्रास देत, खोट्या गुन्ह्यांत अडकवत असल्याच्याही तक्रारी होत्या. दारूबंदी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही अनेकदा या टोळीवर कारवाईची मागणी केली होती. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईचे आता त्यांनी स्वागत केले आहे.
उपद्रवी टोळ्यांना तडीपार करण्याचा अधिकार पोलिस अधक्षीकांना असतो. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातून आणखी काही टो‌ळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव असून त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

WhatsApp: व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने ‘त्यांनी’ केला अॅडमिनवर हल्ला – whatsapp group admin attacked by two men after removing member

नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती...

Recent Comments