Home संपादकीय shyam rangela: मिमिक्री कुणाची रेऽऽ - jata jata by chakor , comedian...

shyam rangela: मिमिक्री कुणाची रेऽऽ – jata jata by chakor , comedian shyam rangeela modi mimicry video on petrol prices pump


हे अजिबात आवडलेलं नाही. हे अजिबात चालणार नाही. म्हणजे काय! कसं कधी असतं का? असं कधी नसतं ना! सर्वांत शक्तिशाली व्यक्तीच्या आवाजात मिमिक्री करण्यात कोणतं आलं टॅलेंट! विनोद आम्हीही करतो. हसू आम्हालाही येतं; पण आम्ही कसं ओठातल्या ओठात हसतो. असं हसण्यासाठी आम्ही आमचेच विनोद तयार करतो. ते आम्ही आमचे आम्हालाच सांगतो. मिमिक्री आपली स्वत:ची करावी. दुसऱ्याची नव्हे. यात खरा ओरिजनलपणा. हेच खरं टॅलेंट. बाकी सारी नक्कल. या नकलीचा निषेध, निषेध आणि निषेध. बंद करा… बंद करा… दुसऱ्यांची मिमिक्री बंद करा. मिमिक्री कुणाची रेऽऽ कुणाची… आपलीच आपल्या आवाजाची!

वक्तृत्वकौशल्याचा क्लास संपल्यानंतर झालेल्या निषेधाच्या बैठकीत असा मन:पूर्वक निषेध नोंदवून राम घरी आला. श्यामवर खूप चिडला होता. त्याचा राग राग येत होता. हा आहे राम, मित्र त्याचा श्याम. रामचे गाल गोबरे गोबरे, खप्पड श्यामचे गाल! दोघंही तारुण्यात; पण बालपण गेलं नव्हतं. श्यामच्या काही सवयी रामला आवडेना. त्यातली एक प्रमुख सवय म्हणजे, सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्‌सअॅपवरचे गुड मॉर्निंग मेसेज न वाचणं. परवाचा तो मेसेज वाचला असता त्यानं, तर सायकलमध्ये हवा भरण्यासाठी तो पेट्रोल पंपावर गेला नसता. स्वत:चा पंप विकत आणला असता. ‘ऑइल टू एक्स्पेन्सिव्ह, चेंज युअर पंप’ हा मेसेज किती काळजीनं पाठवला होता; पण हाय रे… श्याम रंग ‘रंगी’ला रे… तो गेलाच त्या पंपावर आणि झाला ना त्या पेट्रोलपंप चालकाला मनस्ताप. आता त्याची माफी मागून काय उपयोग! मिमिक्रीत आपण करिअर करू शकतो, असं श्यामला वाटू लागलं. सराव सुरू झाला. या सरावासरावात पंपावर गेला आणि व्हिडिओ शूट केला. रामच्या गोबऱ्या गालांना फुगण्याचं निमित्त मिळालं.

दोघांची पुन्हा कट्टीफू झाली. रामला कट्टीफू ही कुंफूसारखी वाटे. क्रिकेटचं वेड असलेली माणसं जशी चालताफिरता बॉलिंगची नाही, तर बॅटिंगची प्रॅक्टिस करतात, तशीच राम कट्टीफूची करे. श्यामसोबत करे. रामला कशाचाही राग येई. गोबऱ्या गोबऱ्या गालांना रागही मोठा शोभून दिसे. श्याम त्याला चिडवे. त्याची मिमिक्री करे. श्यामची मिमिक्री रामला खूप आवडे. तो खुदकन्‌ हसून दाद देई. श्यामला स्फुरण चढे. हे असं नेहमी होई.

रामला वक्तृत्वकौशल्यात रस. यासाठी त्यानं क्लास लावला होता. निषेधाची ती बैठक इथलीच. कोर्स खूप सखोल होता. आखीवरेखीव होता. ही थेट वार्षिक परीक्षेची तयारी. अधल्यामधल्या कुठल्या चाचण्या नाहीत. वक्तृत्व, वादविवाद, प्रवचन, भाषण, संभाषण, देहबोली, माइम, मिमिक्री अशी प्रकरणं त्यानं अभ्यासली. अभ्यासता अभ्यासता मथितार्थ कळला. मिमिक्री करावी ती आपल्याच आवाजाची. हेच खरं कौशल्य!

हे उमगलं तसं त्याचं अंतरंग उजळून निघालं. प्रकाशच प्रकाश! हा प्रकाश त्यानं कुपीत नीट सांभाळून ठेवला आहे. निषेधाच्या फळीची गरज म्हणून वक्तृत्वासोबत त्यानं कलाकलानं मिमिक्रीचा सराव सुरू केला आहे. यात कुठं अडलाच, तर प्रकाशाची कुपी उघडतो आणि स्वत:ला उजवळून घेतो.

– चकोरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

Recent Comments