सिद्ध चिकित्सेचा उपयोग चेन्नईमधील कोविड सेंटरमध्ये २४ रुग्णांवर केला गेला. तेथे हे रुग्ण बरे झाल्यानंतर या चिकित्सेचा उपयोग करोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या व्यासरपदीच्या आंबेडकर कॉलेजमध्ये करण्यात येत आहे, असे सरकारने म्हटले आहे. या चिकित्सा पद्धतीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. सिद्ध चिकित्सा पद्धत ही वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित नसून या चिकित्सा पद्धतीमुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो, असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. मात्र, हे सगळे खोटे असल्याचे म्हणत तामिळनाडूचे आरोग्य मंत्री पंडियाराजन यांनी लोकांच्या सिद्ध चिकित्साविरोधी दावा फेटाळून लावला आहे.
ज्या लोकांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत, आणि ज्यांना ही चिकित्सा घेण्याची इच्छा आहे, अशा रुग्णांनाच ही चिकित्सा देण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. असे चिकित्सा घेणारे रुग्ण खुश असल्याचेही ते म्हणाले. मात्र, अॅलोपॅथी पद्धतीची चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांनी सिद्ध चिकित्सा पद्धतीविरोधात आवाज उठवला आहे. या पद्धतीला कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या पद्धतीची कोणतीही चाचणी घेण्यात आलेली नाही. यामुळे ही चिकित्सा पद्धती किती सुरक्षित आहे या वर स्पष्टपणे काही सांगता येत नाही, असे अॅलोपथीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वाचा: कोरोनिल: बाबा रामदेवांवर राजस्थान सरकार गुन्हा दाखल करणार, उत्तराखंडातही मिळाली नोटीस
या पूर्वी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या कबूसरा कुडीनीर या औषधालाही सत्ताधारी पक्ष एआयएजीएमकेने प्रोत्साहन दिले होते.
एकीकडे रामदेव बाबा यांच्या पतंजलीने करोनावरील औषधाचा दावा केल्यानंतर तामिळनाडू सरकारकडून सिद्ध चिकित्सचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयुष मंत्रालयाने या औषधाबाबत आपल्याकडे काही माहिती नसून पतंजलीने तसा प्रचार करू नये असे म्हटले आहे. शिवाय उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली असून राजस्थानमध्येही बाबा रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
वाचा: केरळचे जगात नाव; ‘रॉकस्टार’ आरोग्यमंत्री शैलजांना संयुक्त राष्ट्राचे आमंत्रण
वाचा:करोना: देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या वर, ४ दिवसात वाढले ६० हजार रुग्ण