Home महाराष्ट्र sindhudurg lockdown: Sindhudurg Lockdown करोनाला वेळीच वेसण; सिंधुदुर्गात उचलले 'हे' मोठे पाऊल...

sindhudurg lockdown: Sindhudurg Lockdown करोनाला वेळीच वेसण; सिंधुदुर्गात उचलले ‘हे’ मोठे पाऊल – coronavirus updates lockdown in sindhudurg for seven days


सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना बाधित ( coronavirus in sindhudurg ) रुग्णांची संख्या वाढत असून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या वाढत्या गर्दीला आवर घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कठोर निर्णय घेत संपूर्ण जिल्ह्यात आजपासून ७ दिवसांसाठी म्हणजेच ८ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. ( Sindhudurg Lockdown )

वाचा: मुंबईत सलून, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन कालावाधीमध्ये पुढील बाबींना बंदी असणार आहे…

> लॉकडाऊनदरम्यान कोणालाही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील.
> अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकराची वाहतूक त्यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने, रिक्षा, जीप, टॅक्सी, कार, बस बंद राहतील.
> सर्व आठवडी बाजार बंद राहतील, अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील.
> सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील.
> कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, प्रवासावेळी मास्कचा वापर बंधनकारक आहे.
> अत्यावश्यक सेवेसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास किमान ६ फुटांचे अंतर ठेवावे.
> दुकानावर एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत, याची खबरदारी बाळगावी.
> मोठ्या प्रमाणावर जमाव जमेल अशी कृती करण्यास प्रतिबंध राहील.
> सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, पान, तंबाखू यांच्या सेवनावर तसेच मद्यपानावर बंदी आहे.
> कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर हे प्रवेशाच्या ठिकाणी उपलब्ध ठेवणे संबंधित आस्थापना प्रमुखावर बंधनकारक राहील. > कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापर असणाऱ्या जागा सतत निर्जंतुकीकरण कराव्यात.
> अंत्यविधी व अंत्ययात्रा यामध्ये २० व्यक्ती उपस्थित राहू शकतील.

वाचा: ‘लालबागचा राजा’चे आगमन व्हायलाच हवे

‘या’ सेवा सुरू राहणार

> लॉकडाऊन काळात सर्व अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये, आस्थापना या १०० टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीसह सुरू राहतील. अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये १० टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
> पिण्याचा पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, पोस्टल सेवा, कुरियर सेवा, दूरध्वनी सेवा व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना, ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स सेवा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू राहतील.
> मांस, मासे, अंडी यांची विक्री करणारी दुकाने बुधवार, शुक्रवार, रविवार व मंगळवारी सुरू राहतील.
> रुग्णालये व सर्व वैद्यकीय आस्थापना, औषधालये, पशुवैद्यकीय दवाखाने, देखभाल केंद्र व पाळीव प्राण्यांच्या पशुवैद्यकीय आस्थापना व दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय व त्यांच्या आस्थापना, ऑइल, गॅस, पेट्रोलियम व ऊर्जा साधने पुरवणाऱ्या आस्थापना, त्यांची गोदामे व वाहतूक, प्रसार माध्यमे व इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू राहील.

वाचा: अंत्यसंस्काराला गेलेल्या ६ जणांना करोना; अहवाल वेळेत आला असता तर

रुग्णसंख्या २२८ वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी १२ व्यक्तींचे करोना तपासणी आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण ९१ नमुने तपासण्यात आले होते. त्यात १२ जण करोनाबाधित आढळले तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २२८ इतकी झाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

Recent Comments