Home शहरं नाशिक sinnar ghoti highway accident: सिन्नर-घोटी महामार्गावर टेम्पो उलटला; २ शेतमजूर जागीच ठार,...

sinnar ghoti highway accident: सिन्नर-घोटी महामार्गावर टेम्पो उलटला; २ शेतमजूर जागीच ठार, १० गंभीर – sinnar ghoti highway accident 2 labours killed and 10 critical after tempo overturned on road


म. टा. वृत्तसेवा : नाशिकरोड

शेतमजुरांची वाहतूक करणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात २ शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली गावाजवळील वाजे पेट्रोल पंपाजवळ घडला. तर १० शेजमजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

या अपघातग्रस्त टेम्पोतून सुमारे २५ शेतमजूर प्रवास करीत होते. हे सर्व शेतमजूर जखमी झाले असून, त्यापैकी १० शेतमजूर गंभीर जखमी आहेत. त्यातील २ मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, इतर ८ शेतमजुरांवर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टेम्पो साकुर फाटा येथून पांढुर्ली गावाच्या दिशेने शेतमजुरांना घेऊन जात होता. या टेम्पोत मकादेखील होता. वाजे पेट्रोल पंपाजवळील एका घातक वळणावर हा टेम्पो उलटला. शेतमजूर टेम्पोखाली दबले गेले. त्यापैकी २ शेतमजूर जागीच ठार झाले. ठार झालेल्या मजुरांपैकी एकाचे नाव अजय मोतीराम वाघ (राहणार- निनावी, ता. इगतपुरी) असे असून, दुसऱ्या मृत शेतमजुराची ओळख पटू शकली नव्हती. सिन्नर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त शेतमजुरांची भेट घेतली. घटनेचा पंचनामा केला. टेम्पोचे ब्रेकलायनर अडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती टेम्पोचालकाने दिली. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments