Home क्रीडा Sir Everton Weekes: सर, तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते; सचिन झाला भावूक!...

Sir Everton Weekes: सर, तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते; सचिन झाला भावूक! – legendary batsman sir everton weekes dies at the age of 95 sachin says you will be missed sir


मुंबई: वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर एव्हर्टन वीक्स यांचे बुधवारी वयाच्या ९५व्या वर्ष निधन झाले. वीक्स यांना २०१९ मध्ये हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. वीक्स यांच्या निधनावर आयसीसीसह जगातील अनेक क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील विक्स यांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा- …म्हणजे, नको असलेल्या गोष्टीपासून सुटका!

एव्हर्टन वीक्स यांचा जन्म वेस्ट इंडिजमधील बारबाडोस या बेटावर झाला. त्यांनी वेस्ट इंडिजकडून ४८ कसोटी सामने खेळले. सर क्लाइट वॉल्कॉट आणि सर फ्रॅक वारेल यांच्या सोबत त्यांनी ५०च्या दशकात जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत अशी फलंदाजीची फळी तयार केली होती. यामुळेच त्यांना कॅरेबियने देशातील क्रिकेटचे पितामह म्हटले जाते.

वाचा- जेव्हा रोहितने बांगलादेशला पळवून पळवून मारले; पाहा व्हिडिओ!

वीक्स, वॉल्कॉट आणि वारेल या तिघांचा जन्म ऑगस्ट १९२१ ते जानेवारी १९२६ या १८ महिन्याच्या कालावधीत झाला होता. पुढे या तिघांनी १९४८साली तीन आठवड्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वारेल यांचे १९६७ साली तर वॉल्कॉट यांचे २००६ साली निधन झाले. ब्रिजटाऊनमधील राष्ट्रीय स्टेडियम या तिघांच्या थ्री डब्ल्यूज ओव्हल या नावाने ओळखले जाते.

वाचा- २०११चा वर्ल्ड कप भारताला विकला; संगकाराला समन्स!

वीक्स यांनी १९४८ ते ५८ या काळात ५८.६२च्या सरासरीने ४ हजार ४५५ धावा केल्या. यात १५ शतकांचा समावेश होता. वीक्स यांची टायमिंग सुंदर होती. ते चेंडूची लेंथ लगेच ओळखायचे. त्यांनी १५२ प्रथम श्रेणी सामन्यात १२ हजार १० धावा केल्या. यात त्यांची सरासरी ५५.३४ इतकी होती तर ३६ शतकांचा समावेश होता. ३०४ ही त्यांची सर्वोच्च खेळी होती.

वाचा- क्रिकेटचा कोच गेला सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला, आता स्वतःवरच येणार ‘ही’ वेळ

कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक करण्याचा विक्रम वीक्स यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंड आणि भारताविरद्ध १९४८ मध्ये पाच शतक केली.

तुमच्या फलंदाजीबद्दल मी वेस्ट इंडिजच्या इतर दिग्गज खेळाडूंकडून खुप ऐकले आहे. आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू. भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट सचिनने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

वाचा- करोनाच्या राजधानीत IPL रंगणार? बीसीसीआयचा धाडसी विचार!

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी वीक्स यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. एक सभ्य आणि चांगले व्यक्ती होते. ते आमच्या क्रिकेट खेळाचे पितामह होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.

निवृत्ती घेतल्यानंतर वीक्स क्रिकेटमधून दूर गेले नाहीत. प्रशिक्षक, प्रशासक आणि मॅच रेफरी म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७९ च्या वर्ल्ड कपमध्ये ते कॅनडाचे कोच होते. २००९ साली आयसीसी हॉल ऑफ फ्रेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. १९९५ साली त्यांना नाइटवुड अर्थात सर ही उपाधी देण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

Recent Comments