Home मनोरंजन siya kakkar suicide: टिकटॉक स्टार सिया कक्कड आत्महत्या; काही तासांपूर्वीच शेअर केला...

siya kakkar suicide: टिकटॉक स्टार सिया कक्कड आत्महत्या; काही तासांपूर्वीच शेअर केला होता व्हिडिओ – Tiktok And Social Media Star Siya Kakkar Commits Suicide


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं या जगातून घेतलेल्या अकाली एक्झिटमुळं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातू अद्याप सिनेसृष्टी सावरली नसताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोळा वर्षाच्या सोशल मीडिया आणि टिकटॉक स्टारनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सिया कक्कड असं आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टारचं नाव असून, आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आदल्या रात्री सियाचं तिचा मॅनेजर अर्जून सरीन याच्यासोबत एका व्हिडिओसंदर्भात बोलणं झालं होतं. ‘आमचं बोलण झालं तेव्हा सिया अगदी व्यवस्थीत होती, चांगल्या मूडमध्ये होती,पण तिनं अचानक असं पाऊल का उचललं हे समजत नाहीए’, असं अर्जूननं म्हटलं आहे.


सियानं १९ तासांपूर्वी डान्सचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडिओत सिया पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतेय. हाच व्हिडिओ तिनं पाच दिवसांपूर्वी शेअर केला होता. इन्स्टाग्रावर सियाचे तब्बल ९१ हजारांहून अधिक फॉलोअर्स असल्याची माहिती आहे.

केवळ टिकटॉकवरच नाही तर सोशल मीडियावरही सिया प्रसिद्ध होती. तिचा चाहतावर्गबही मोठा आहे. तिच्या आत्महत्येची बातमी आल्यानंतर चाहत्यांनाही धक्का बसला असून त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

Recent Comments