Home शहरं सोलापूर solapur News : सोलापुरात महिलेचा मृत्यू - woman dies in solapur

solapur News : सोलापुरात महिलेचा मृत्यू – woman dies in solapur


सोलापूर : सोलापुरात सोमवारी सात रुग्ण वाढले असून, सोलापुरात आता करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३५ वर गेली आहे. रविवारी हा आकडा १२८ होता. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आठवडाभरापूर्वी जुळ्यांना जन्म दिलेल्या मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील करोनाबाधित २६ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री मृत्यू झाला असून सोलापुरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एक महिला सात महिन्यांची गर्भवती होती. तिला त्रास होऊ लागल्यामुळे सोलापुरातील विजापूर रस्त्यावरील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला चक्कर येऊ लागल्यामुळे सात रस्ता परिसरातील रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर या दवाखान्यातून तिला हलवले आणि पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २३ एप्रिल रोजी या महिलेची प्रसूती झाली आणि तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. मात्र त्याच ठिकाणी त्या महिलेला सर्दी आणि तापाचा त्रास होऊ लागला आणि याच दरम्यान दोन बाळापैकी एका बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर तत्काळ या महिलेला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनाची लागण झालेल्या या महिलेचा अखेर रविवारी रात्री उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pakistan pti leaders fight: Video सिंध विधानसभेत राडा; इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आपसात भिडले! – pakistan leaders of imran khans party tehreek e...

सिंध: संसद, विधानसभेत विरोधी पक्षातील सदस्य हमरीतुमरीवर येतात. मात्र, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या विधानसभेत इम्रान खान यांच्या 'तहरीक-ए-इन्साफ' या पक्षातील तीन नेत्यांमध्ये राडा झाला....

Ahmednagar: ‘शासनाचा माणूस’ आहे सांगून ‘तो’ रुग्णांना घालायचा गंडा, पण… – ahmednagar man duped patients pretext of health policy

म. टा. प्रतिनिधी, नगर: गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्याच...

संमेलनाबाबत संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, एकीकडे चाळीस समित्यांच्या रोजच्या उठाबशांनी सर्वत्र चर्चेत आलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा वाढत्या करोनापुढे निभाव लागणार का, असा सवाल आता साहित्य...

Recent Comments