Home शहरं औरंगाबाद Solar Eclipse 21 June: कंकणाकृती नव्हे; महाराष्ट्रात दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण - solar...

Solar Eclipse 21 June: कंकणाकृती नव्हे; महाराष्ट्रात दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण – solar eclipse will be visible in maharashtra on june 21


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः खगोलप्रेमींसाठी पर्वणी असलेले सूर्यग्रहण रविवारी (२१ जून) अनुभवता येणार आहे. सूर्यग्रहण सकाळी दहा वाजता सुरू होणार असून पुढील साडेतीन तास पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती दिसणार नसून महाराष्ट्र आणि इतर राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण रविवारी पाहता येणार आहे. या दिवशी ज्येष्ठ अमावास्या असून सकाळच्या वेळात ग्रहण आहे. या ग्रहणाच्या आधी व नंतर येत असलेल्या पौर्णिमेला दोन चंद्रग्रहण होणार आहेत. ओमान व भारतात केवळ सहा महिन्यात दोन कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याची संधी मिळाली आहे. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भाग व उत्तरांचल प्रदेशात काही ठिकाणी सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसणार आहे. तर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे, असे खगोलतज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

यावेळी खूप कमी कालावधीसाठी कंकणाकृती स्थिती अनुभवता येणार आहे. भारतातील कंकणाकृती स्थिती ३३ ते २८ सेकंद दरम्यान आहे. हे सूर्यग्रहण झाल्यानंतर साधारण २०३४ पर्यंत खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, असे औंधकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात सूर्यग्रहण कंकणाकृती न दिसता खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सकाळी साधारण दहा वाजता ग्रहण सुरु होईल व दुपारी दिडच्या दरम्यान ग्रहण मोक्ष पहायला मिळेल.

ग्रहणाची वेळ

मुंबई

ग्रहण स्पर्श: १०:००

ग्रहण मध्य: ११:३७

ग्रहण मोक्ष: १३:२७

ग्रहण कालावधी : ०३ तास २७ मिनिटे

पुणे

ग्रहण स्पर्श: १०:०२

ग्रहण मध्य: ११:४०

ग्रहण मोक्ष: १३:३०

ग्रहण कालावधी : ०३ तास २८ मिनिटे

औरंगाबाद

ग्रहण स्पर्श: १०:०६

ग्रहण मध्य: ११:४६

ग्रहण मोक्ष: १३:३६

ग्रहण कालावधी : ०३ तास ३० मिनिटे

अहमदनगर

ग्रहण स्पर्श: १०:०५

ग्रहण मध्य: ११:४४

ग्रहण मोक्ष: १३:३४

ग्रहण कालावधी : ०३ तास २९ मिनिटे

कोल्हापूर

ग्रहण स्पर्श: १०:०३

ग्रहण मध्य: ११:३९

ग्रहण मोक्ष: १३:२८

ग्रहण कालावधी : ०३ तास २५ मिनिटे

नागपूर

ग्रहण स्पर्श: १०:१७

ग्रहण मध्य: १२:०१

ग्रहण मोक्ष: १३:५०

ग्रहण कालावधी : ०३ तास ३३ मिनिटे

सुरक्षितपणे ग्रहण पहा

उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे टाळले पाहिजे. अन्यथा कायमचा आंधळेपणा येण्याची शक्‍यता असते. मोबाईल किंवा कॅमेऱ्याने सूर्यग्रहणाच्या काळात किंवा इतर वेळीही थेट फोटो काढणे डोळ्यासाठी हानिकारक आहे. त्यांनासुद्धा सोलर फिल्टर लावणे आवश्यक असते. सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू नका. सूर्यग्रहण सर्वसाधारण सनग्लासेसने पाहणे सुरक्षित नसते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले “ग्रहण चष्मे” वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात.

सध्या करोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आपसात सुरक्षित अंतर ठेवून व ग्रहण चष्मा वापरून सूर्यग्रहण सुरक्षितपणे पहावे. महाराष्ट्रात सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल.

– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

International Women’s Day 2021: घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर – 82 percent of women prefer to buy house for investment : anarock survey

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे...

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

Recent Comments