Home शहरं मुंबई solar power project: महावितरणासाठी टाटांचा सौरऊर्जा प्रकल्प; पुढील २५ वर्षे वीजपुरवठा -...

solar power project: महावितरणासाठी टाटांचा सौरऊर्जा प्रकल्प; पुढील २५ वर्षे वीजपुरवठा – tata’s solar power project for msedcl


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या महावितरणासाठी टाटा पॉवर सौरऊर्जा प्रकल्प उभा करून देणार आहे. यासंदर्भातील कंत्राट अलिकडेच टाटांना मिळाले आहे. परंतु, महावितरणाची प्रत्यक्षात गरज पाचशे मेगावॉटची आहे. त्या तुलनेत शंभर मेगावॉटचा पुरवठा होणार आहे, हे विशेष.

प्रत्येक राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीने त्यांच्या एकूण वीज खरेदीपैकी किमान १७ टक्के वीज अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडून खरेदी करणे अत्यावश्यक असते. महावितरण सध्या आठ ते नऊ टक्के वीजच खरेदी करीत आहे. या श्रेणीत आणखी पुढे जाण्यासाठी महावितरणाने पाचशे मेगावॉट सौरऊर्जा खरेदी करायची होती. पण यापोटी महावितरण फक्त २.७५ रुपये प्रति युनिट दर देण्यास तयार होते. त्यामुळे फक्त दोन कंपन्यांनी यांस प्रतिसाद दिला. त्यापैकी टाटा पॉवरचे कंत्राट मान्य झाले आहे. टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. यानुसार ही कंपनी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणार आहे. त्याद्वारे महावितरणाला पुढील २५ वर्षे वीजपुरवठा होणार आहे. यासंदर्भातील वीज खरेदी करार अद्याप झालेला नाही. परंतु, हा करार झाल्यानंतर १८ महिन्यांच्याआधी टाटांनी या प्रकल्पाची उभारणी पूर्ण करणे अत्यावश्यक असेल.

कार्बन उत्सर्जन कमी

टीपीआरईएल ही कंपनी हा प्रकल्प महावितरणासाठी उभा करीत असले तरी त्यातील फक्त शंभर मेगावॉट वीज महावितरण खरेदी करणार आहे. उर्वरित वीज कंपनीकडून ग्रीडमध्ये टाकली जाणार आहे. या वीज प्रकल्पाची एकूण क्षमता २४० दशलक्ष युनिट इतकी असून जवळपास तेवढेच कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा दावा टीपीआरईएलने केला आहे. या प्रकल्पानंतर आता टाटा पॉवरची एकूण अपारंपरिक वीज निर्मिती क्षमता तीन हजार ५५७ मेगावॉट इतकी होत असून त्यातून दोन हजार ६३७ मेगावॉट विजेचा पुरवठा होत आहे, असे टाटा पॉवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yediyurappa karnataka cm: ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून येडियुरप्पांची लवकरच उचलबांगडी’ – yediyurappa will not remain cm for long karnataka bjp mla hints at rebellion

बेंगळुरू: भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनागौडा पाटील यतनाल यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. बीएस येडियुरप्पा हे फार काळ मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत. त्यांचा उत्तराधिकारी हा...

Recent Comments