‘सोनम तू नेहमीच सरकार आणि प्रशासनाच्या कामांवर टीका करताना दिसते. आता जेव्हा देशाला तुमची खरी गरज आहे. आता तुम्हाला देश वाचवायचा नाहीए का? तुम्ही ढोंगी आहात’, असं म्हणत या युजरनं सोनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. युजरच्या या ट्विटला सोनमनं तिच्या शैलीत उत्तर दिलं होतं मी आणि माझं कुटुंब दान किंवा मदत केल्याचा प्रचार करत नाही’. अशा शब्दांत सोनमनं त्या युजरची बोलती बंद केली होतीं.
करोनाच्या विरोधात देश लढत असताना सोनमने मदत केली नाही असं म्हणत तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती. पण मदतीचा गाजावाजा करायला आवडत नसल्याचं तिनं म्हटलं होतं. सोनमला तिनं केलेल्या मदतीची माहिती जाहिर करायला आवडत नसल्याचंही तिनं म्हटलं आहे.