Home देश Sonia Gandhi: चीनने घुसखोरी केली की नाही?; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल...

Sonia Gandhi: चीनने घुसखोरी केली की नाही?; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल – sonia gandhi asks many questions to modi govt over chinese aggression in east ladakh galwan valley sharing a video


नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकजदा हल्लाबोल करत पूर्व लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या एका व्हिडिओत सोनिया गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत मोदी सरकार स्पष्ट उत्तर देत नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी मोदी सरकार स्थिती स्पष्ट करत देशाला विश्वासात घेईल का?, असा थेट प्रश्न सोनिया गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे.

आज काँग्रेस आणि देशातील नागरिक आमच्या २० शहीद जवानांना श्रद्धांजली देत सलाम दिन साजरा करत आहे. गलवान खोऱ्यात बलिदान देणाऱ्या या २० शूर जवानांप्रती संपूर्ण देश नेहमीच आभारी राहील, असे सोनिया गांधी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देश भारतीय लष्कर आणि सैनिकांसोबत उभा आहे. अशात या संकटाच्या काळात सरकार आपल्या जबाबदारीपासून मागे हटू शकत नाही, असेही सोनिया गांधी पुढे म्हणाल्या.

वाचा: चीनची कुरघोडी सुरूच; ‘वाय’ नाल्याचा मार्ग केला ब्लॉक
आमच्या देशात घुसखोरी झालेली नाही, असे पंतप्रधान सांगत आहेत. मात्र, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री अनेकदा चीनी घुसखोरीची चर्चा करतात, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भारतीय लष्कराचे जनरल, संरक्षण तज्ज्ञ आणि वर्तमानपत्रांनीही उपग्रहाची छायाचित्रे दाखवून या घुसखोरीला दुजोरा दिला असल्याचेही त्या व्हिडिओत म्हणाल्या आहेत.

वाचा: भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे

जर चीनने आमच्या भूमीत घुसखोरी केली नाही, तर मग आमचे जवान शहीद कसे आणि का झाले, हे आज शहीदांना नमन करत असताना देशाला जाणून घ्यायचे आहे, असे ही सोनिया पुढे म्हणाल्या. चीनी सैन्याने लडाखमध्ये कुरघोडी केल्यानंतर आता चीनने ताब्यात घेतलेली जमीन आम्ही परत कशी मिळणार आहोत?… गलवान खोरे आणि पँगाँग त्सो भागात तंबू ठोकून आमच्या भूभाग अखंडतेचे चीन उल्लंघन करत आहे का?… या संपूर्ण विषयाबाबत सरकार संपूर्ण देशाला विश्वासात घेणार की नाही?… असे एकावर एक प्रश्न सोनिया गांधी यांनी व्हिडिओद्वारे मोदी सरकारला विचारले आहेत. आज संपूर्ण देश भारतीय लष्कर आणि सैनिकांबरोबर ठामपणे उभा आहे. अशात लष्कराला पूर्ण सहयोग देणे, पूर्ण शक्ती देणे हीच खरी देशभक्ती असल्याचेही त्या म्हणाल्या.

वाचा: चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?

काँग्रेसने ट्विट केलेला सोनिया गांधी यांचा व्हिडिओ:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments