Home मनोरंजन sonu sood in politics: राजकारणात बिलकूल रस नाहीए: सोनू सूद - not...

sonu sood in politics: राजकारणात बिलकूल रस नाहीए: सोनू सूद – not interested in politics says sonu sood amid bjp entry rumours


मुंबई: लॉकडाउनमुळे मुंबईमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेल्या श्रमिकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत बनून पुढे आला. रात्रीचा दिवस करत त्यानं श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी काम केलं. आतापर्यंत त्यानं जवळपास २० ते २२ हजार श्रमिक मंडळींना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलंय. त्याचं हे काम पाहून, भविष्यात तो राजकारणात येणार की काय अशा चर्चा या निमित्तानं होऊ लागल्या आहेत. पण, सोनूनं त्यावर साफ सांगितलंय, ‘मला राजकारणात बिलकूल रस नाहीय.’

सोनूनं श्रमिकांसाठी केलेल्या कामाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली. सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होत आहे. एका मुलाखतीत सोनू सूदनं स्पष्ट केलं की, ‘मी राजकारणात असतो तर कदाचित आता जे काही करतोय ते मोकळेपणानं करू शकलो नसतो. मी सध्या जे करतोय त्यात खूश आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये मी खूश आहे. ल्या दहा वर्षांपासून मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या. पण, मला राजकारणात जाण्यात रस नाही.’

सोनू भाजपात जाणार?
काही दिवसांपासून सोनू भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही प्रचंड चर्चा आहेत. परंतू या सर्व अफवा असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. त्याला राजकारणात रस नसून समाजसेवा करण्यात रस असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

गुगल ट्रेडिंगमध्येही सोनू सूद ‘सुपर हिरो’; अक्षयला टाकलं मागं

दरम्यान,गेले काही दिवस रोज सुमारे अठरा तासांहून अधिक काळ सोनू फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करण्यात व्यग्र असतो. परंतु, अशा परिस्थितीतही परवानगी मिळण्यात काही प्रमाणात अडचणी येत असल्याचं तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. बसमधून श्रमिकांना पाठवताना सुरक्षित वावराचे नियम तो पाळतो. आसनक्षमता ६० असलेल्या बसमधून तो ३५ प्रवाशांना पाठवतो. या प्रवाशांच्या जेवण-खाण्याची व्यवस्थाही तो करतो. सोनूची मैत्रीण निती गोयलच्या बरोबरीनं ‘मित्र पाठवा’ या उपक्रमाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तो सर्वांसाठी त्यांचा लाडका सुपरहिरो बनला. सोनूच्या ट्विटर अकाऊंटवर त्याला टॅग करून आलेल्या पोस्टला उत्तर देताना, ‘काळजी करू नका. मला तुमची माहिती पाठवा, लवकरच तुम्ही घरी जाल’ असं सांगणारी पोस्ट तो करतो. ट्विटरवर तो ज्या प्रकारे चटकन लोकांना प्रतिसाद देतोय, ते पाहून सोनूचं कौतुक होतंय.
‘तुम बहुत मस्त काम करता है सूद भाई..’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments