Home मनोरंजन sonu sood news: त्यांनी देवघरात ठेवला सोनू सूदचा फोटो, दररोज होते आरती

sonu sood news: त्यांनी देवघरात ठेवला सोनू सूदचा फोटो, दररोज होते आरती


मुंबई- सोनू सूदच्या ट्वीटर अकाउंटवर नजर टाकली तर तुम्हाला अनेक मजेशीर ट्वीट दिसतील. विशेष म्हणजे अनेकांना सोनू स्वतः उत्तरही देतो. सोनूच्या ट्विटरवर एका व्यक्तीने त्याच्या घरातील देव्हाऱ्याचा व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडिओ पाहून अभिनेत्याने असं न करण्याचा सल्ला दिला.

एका व्यक्तीने देवाची आरती करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यात त्याने देव्हाऱ्यात देवांच्या प्रतिमेसोबत सोनूचा फोटोही ठेवला होता. या व्हिडिओला ट्वीट करत त्याने लिहिले की, ‘जी व्यक्ती आईची भेट घालवून देते ती देव असते. सोनू सूदसारखा प्रत्येक व्यक्ती देव नसतो. मी तुम्हाला देवच मानतो. तुम्ही माझी स्वप्न मरू दिली नाहीत आणि माझी आईशी भेट घालून दिली.’

नागपुरात कटिंग चहा घेत खुललं सोनू आणि सोनालीचं प्रेम

सोनूने या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं की, ‘अरे भावा असं नको करू. आईला सांग माझ्यासाठीही दररोज प्रार्थना कर. सगळं काही ठीक होईल.’ दुसऱ्या एका व्यक्तीने सोनूसाठी गाणं रेकॉर्ड करून पाठवलं आणि लिहिलं की, ‘माझं गाणं कधी ऐकणार दादा?’ यावर उत्तर देताना सोनूने लिहिले की, ‘मस्तच! लवकरच भेटून गाणं ऐकीन. तुझ्यात खरचं टॅलेन्ट आहे.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूद यानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी फोन करून कौतुक केलं होतं.

मराठी अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन!

राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं होतं.राज्यपपाल कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
आगीतून फोफाट्यात! चित्रीकरणाला परवानगी पण कडक आहेत नियम

सोनू करत असलेल्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. मजूरांच्या प्रवासारावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू असले तरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याला ‘नायक’म्हटलं आहे. तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी देखील त्याला सलाम ठोकला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेल्या ‘या’ महान क्रिकेटपटूंना वाहणार श्रद्धांजली – india, australia players to wear black armbands during...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे...

Recent Comments