Home विदेश south africa rape: डोळ्यांदेखत ३ नातींवर बलात्कार; हादरलेल्या ७१ वर्षीय आजीने... -...

south africa rape: डोळ्यांदेखत ३ नातींवर बलात्कार; हादरलेल्या ७१ वर्षीय आजीने… – three granddaughter raped by unidentified men front of grandmother in south africa


जोहान्सबर्ग: घरात घुसून काही जणांनी ७१ वर्षांच्या आजीसमोरच तीन नातींवर बलात्कार केल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील क्वाजुलू-नताल प्रांतात घडली. नातींवरील अत्याचाराची घटना डोळ्यांदेखत पाहणाऱ्या आजीला धक्का सहन न झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

क्वाजुलू – नताल प्रांतात घडलेल्या या बलात्काराच्या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. काही लोक ७१ वर्षीय महिलेच्या घरात घुसले. त्यांनी तिच्या तीन नातींवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे नातींवर बलात्कार होत असताना या वृद्धेला जबरदस्तीने समोर बसवले होते. डोळ्यांदेखत नातींवर बलात्कार होत असल्याचा वृद्धेला मोठा धक्का बसला. तो सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यू झाला.

महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार, २५ हजार ‘इनाम’

बहिणीवरील बलात्काराचा त्याने ६ वर्षांनंतर ‘असा’ घेतला बदला

डेली मेलच्या वृत्तानुसार, घरात किती लोक घुसले होते याची माहिती मिळू शकली नाही. तर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार, बलात्कार करणारी एकच व्यक्ती होती. त्यांनी अनुक्रमे १९, २२ आणि २५ वर्षाच्या तीन मुलींना एका खोलीत बंद केले. त्यानंतर ७१ वर्षीय महिलेला या खोलीत फरफटत घेऊन आले. तिला एका खुर्चीला बांधले. त्यानंतर एका आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून आळीपाळीने तिन्ही मुलींवर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, डोळ्यांदेखत नातींवर बलात्कार होत असल्याचे पाहून आजीला धक्का बसला. ती बेशुद्ध पडली. यानंतर तिचा मृत्यू झाला.

पूर्वाश्रमीच्या प्रियकराने महिलेला भरबाजारात भोसकले, पोलीस येईपर्यंत तो…

हृदयविकाराने वृद्धेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून आरोपींनी हे कृत्य केले असावे. कारण घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही. मुलींना मारहाण आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलीस प्रवक्ते नाकोबिल ग्वाला यांनी सांगितले की, आरोपी नेमके किती आणि कोण होते हे अद्याप कळू शकलेले नाही. हल्लेखोराने कपड्याने चेहरा झाकलेला होता. घटनेवेळी आजी बेशुद्ध पडली होती, असे पीडितांनी सांगितले.

मुलींचे वडील घरी पोहोचले त्यावेळी त्यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेत खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

पुणे हादरले; भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून रिक्षाचालकाची हत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची दिवसाढवळ्या हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ – nashik trimbakeshwar former mayor murdered broad daylight

त्र्यंबकेश्वर (नाशिक): त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह...

hathras gangrape case: ​हाथरस गँगरेप : फॉरेन्सिक रिपोर्टवर प्रश्न; दोन डॉक्टरांनी गमावली नोकरी – Aligarh Doctor Azim Malik Who Questioned Fsl Report In Hathras...

अलीगढ, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या चर्चित हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दलित तरुणीच्या 'फॉरेन्सिक अहवाला'वर (FSL Report) प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अलीगढच्या...

Deepali Sayed: Deepali Sayed: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी – mumbai man arrested for allegedly issuing threats to marathi actress deepali bhosale sayed

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) हिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या...

Recent Comments