Home देश special corona fees: दिल्लीत दारू महाग; ७० टक्के करोना कर द्यावा लागणार...

special corona fees: दिल्लीत दारू महाग; ७० टक्के करोना कर द्यावा लागणार – delhi government has imposed ‘special corona fees 70 percent tax on maximum retail price of the liquor it will be applicable from today


नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यात कंटेन्मेंट झोन वगळून दारू दुकानं खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण या दारू दुकानांवर लांबच लांब रांगा आणि गर्दी होतेय. हे बघून दिल्ली सरकारने आता दारूवर करोना कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत उद्यापासून दारू महागणार आहे. दिल्ली सरकारने एमआरपीवर ७० टक्के करोना कर लावला आहे. हा निर्णय घेऊन दिल्ली सरकारने दारू पिणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. हरयाणा सरकारनेही अशाच प्रकारे दारूवर अधिकचा कर लावून तळीरामांना धक्का दिला आहे.
दिल्लीत दारूची दुकानं उघडताच काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काही ठिकाणी गोंधळामुळे पळापळा झाली. अनेक दुकानांबाहेर लांबच लांब रांगा दिसल्या.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून नाराजी

दिल्लीतील दारूच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली. दारू दुकानं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंत सरकारने त्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. दिल्लीत दारू दुकानांबाहेर घडलेल्या घटना विचलीत करणाऱ्या आहेत, असं हर्षवर्धन म्हणाले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचा इशारा

दिल्लीत पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवले गेले. दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारुंच्या दुकानांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. या सर्व प्रकारावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केलीय. पुन्हा अशी परिस्थिती दिसून आली तर संपूर्ण परिसर सील केला जाईल, अशी तंबीच त्यांनी नागरिकांना दिलीय. यापुढे दारुच्या दुकानांसमोर गर्दी करणाऱ्यांना आणि रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in mumbai: शिवसेनेच्या ‘या’ खेळीमुळे भाजपमध्ये खदखद; संघर्ष आणखी तीव्र होणार – disput between bjp and shivsena over bmc standing...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई पालिका स्थायी समितीच्या निधी वाटपातील भेदभावामुळे भाजपकडून यापुढे विरोधक म्हणून अधिक आक्रमक भूमिका बजावली जाणार आहे. स्थायी...

registration for covid 19 vaccine: कोविड १९ लसीकरण : सामान्यांना नाव नोंदणीसाठी CoWIN खुलं – registration for covid 19 vaccine on cowin 2.0 portal...

हायलाइट्स:cowin.gov.in या वेबसाईटवर करा क्लिकनाव नोंदणीसाठी को-विन हे मोबाईल अॅप्लिकेशनही डाऊनलोड करू शकता.करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सहा आठवड्यांपर्यंत सुरू राहीलनवी दिल्ली : कोविड...

West bengal: राष्ट्रीय आणि प्रादेशिक – editorial on the assembly elections in four states and one union territory

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातली कोणतीही निवडणूक ही साऱ्या देशाचे राजकीय तापमान...

Recent Comments