Home आपलं जग करियर Spoken English: दिल्लीच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे धडे - delhi government...

Spoken English: दिल्लीच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे धडे – delhi government launches online spoken english programme for class 10, 12 students of government schools


ब्रिटीश काउन्सिल आणि मॅकमिलन एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीतल्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन इंग्रजी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग चालवले जाणार आहे. हे वर्ग दिल्लीच्या सरकारी शाळांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. हे विद्यार्थी सध्या निकालाची वाट पाहत आहेत, पण तोपर्यंत त्यांची सॉफ्ट स्कील वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की दिल्लीच्या दहावीचे सुमारे १ लाख ६० हजार आणि बारावीचे सुमारे १ लाख १२ हजार विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी पर्सनालिटी डेव्हलपमेंट आणि स्पोकन इंग्लिशचे ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आपला मोकळा वेळ यानिमित्ताने सत्कारणी लावू शकतील.

सिसोदिया यांनी शनिवारी शिक्षण विभागाचे सल्लागार, अधिकारी, शिक्षक, पालक आणि मुलांसमवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर सिसोदिया म्हणाले, आम्ही नववीच्या मुलांसाठी ऑनलाईन गणिताचा वर्ग सुरू केला आहे ज्यामुळे मुलांची भीती कमी होईल, पण इंग्रजी बोलण्याच्या कौशल्यावरही काम करण्याची गरज आहे. आपण इंग्रजीत संवाद साधू शकत नाही, हा न्यूनगंड एकाही विद्यार्थ्यात राहायला नको. हिंदी ही आपली भाषा आहे, हिंदी हे शिक्षणाचे माध्यम आहे, परंतु इंग्रजीचे महत्त्व आपण कमी लेखू शकत नाही हे समजणे आवश्यक आहे. भविष्यात, आमच्या मुलांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे.

ब्रिटीश काउन्सिल आणि मॅकमिलन एज्युकेशनच्या प्रतिनिधींना सांगितले, ‘संपूर्ण अभ्यासक्रम दोन भागात विभागलेला असेल. पहिल्या भागात विद्यार्थ्यांना रोजच्या वापरातल्या इंग्रजीबद्दल माहिती देण्यात येईल. दुसऱ्या भागता मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर काम केले जाईल. यात विद्यार्थ्याना ताणतणाव व्यवस्थापन आणि मुलाखतीला सामोरे कसे जावे आदी गोष्टी शिकवल्या जातील.’

लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेची घंटा वाजेल, पण…

दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाच्या टिप्स

‘या’ दिवशी होणार नीट, जेईई परीक्षांच्या तारखांची घोषणाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Arnab Goswami: हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स; ‘हे’ आहे कारण – legislative assembly violation committee sommones to arnab goswami

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे.  Source link

Mumbai Coastal Road Project: ‘किनारी मार्ग’ वेगात – mumbai coastal road project :100 meters of underground tunnel dug in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी मार्गाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 'मावळा' या टीबीएम मशिनने खणल्या...

Recent Comments