Home क्रीडा sports: गूड न्यूज : चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी गोड बातमी - in...

sports: गूड न्यूज : चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी गोड बातमी – in 4th lock down home ministry allows sports complexes, stadiums to open


करोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनला आता बरेच लोकं वैतागलेले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू घरीच बसून आहेत, त्यांना सरावही करता येत नाही. लॉकडाऊनमुळे एकही स्पर्धा होताना दिसत नाही. त्यामुळे चाहतेही चांगलेच वैतागलेले आहे. पण आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी गोड बातमी आली आहे. या बातमीनंतर क्रीडा चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सुरु होणाऱ्या काही गोष्टींमुळे खेळाडूंना हायसे वाटणार असून त्यांच्यासह चाहतेही खूष होणार आहे.

वाचा- करोना व्हायरसने दिलाय एक पॉझिटिव्ह मेसेज, तुम्हाला समजला का…
गेल्या दोन महिन्याच्या काळात एकही स्पर्धा चाहत्यांना पाहता आली नव्हती. त्याचबरोबर आपले आवडते खेळाडू नेमके काय करत आहेत, हेदेखील चाहत्यांना कळत नव्हते. पण आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना या साऱ्या गोष्टी पाहता येणार आहेत कारण आता क्रीडा क्षेत्रावरील बंधन थोडी शिथील करण्यात आली आहेत.

लॉकडाऊनमुळे खेळाडूंनी एकत्र येऊ नये, असे म्हटले होते. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरीच होते. पण आता मात्र असे होताना दिसणार नाही. कारण चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

वाचा –करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल…

चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धा भरवता येऊ शकतात. त्यामुळेच चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी असेल. स्टेडिमबरोबरच क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार आहेत, जेणेकरून खेळाडूंना सराव करता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल. पण हे दोन महत्वाचे निर्णय झाले असले तरी एक मोठा निर्णय मात्र अजून होऊ शकलेला नाही.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा संकुले आणि स्टेडियम्स खुली करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही चांगली बातमी आहे. पण हे निर्णय जरी झाले असले तरी स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांना एंट्री मात्र नाकारण्यात आली आहे. जरी एखादी स्पर्धा भरवली तरी त्यासाठी अजूनपर्यंत तरी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

सिद्धार्थ आनंद: सहाय्यक दिग्दर्शकाने मारलंच नाही, जाणून घ्या ‘पठाण’च्या सेटवर नक्की काय घडलं – story behind pathan movie director siddharth anand fight

मुंबई-शाहरुख खान यांच्या आगामी 'पठाण' सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण...

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचं जावडेकरांना महत्त्वाचं पत्र; केली ‘ही’ विनंती – mangrove conservation aditya thackerays letter to prakash javadekar

मुंबई: राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास वा सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे...

Recent Comments