Home क्रीडा sports News : दुर्मीळ फोटो पाहून सचिन तेंडुलकर झाला भावूक... - sachin...

sports News : दुर्मीळ फोटो पाहून सचिन तेंडुलकर झाला भावूक… – sachin tendulkar became emotional after saw his old photo


सचिन तेंडुलकर. भारताचा माजी महान क्रिकेटपटू. आपल्या अद्वितीय फलंदाजी शैलीने त्याने चाहत्यांना स्वर्गीय आनंद दिला. त्यांच्यावर मोहिनी घातली. अनेकांच्या मनात त्याची मंदीरं बांधली गेली. सचिन हा भारतीयांसाठी फक्त क्रिकेटपटू राहीला नव्हता, तर काही जणांसाठी तो देवही झाला होता. त्यामुळे निवृत्तीनंतरही सचिन जागा अजून कोणीही घेऊ शकलेला नाही. सचिनन चाहत्यांना अनंत आनंदाचे क्षण दिले. क्रीडा चाहत्यांसाठी तो एक देवदूतच होता. सचिनच्या आयुष्यातील काही गोष्टी जसे चाहते विसरू शकत नाही, तसा दस्तुरखुद्द सचिनही नाही. त्यामुळेच एक दुर्मीळ फोटो पाहून सचिन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आता हा फोटो कोणता आणि सचिन भावूक का झाला, पाहूया…

सचिन भावूक का झाला, पाहूया…​

सचिनच्या आयुष्यातील काही गोष्टी जसे चाहते विसरू शकत नाही, तसा दस्तुरखुद्द सचिनही नाही. त्यामुळेच एक दुर्मीळ फोटो पाहून सचिन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आता हा फोटो कोणता आणि सचिन भावूक का झाला, पाहूया…

मूर्ती लहान, पण किर्ती महान…

maharashtra times

सचिन जेव्हा आंतरराषट्रीय स्तरावर क्रिकेट खेळायला उतरला तेव्हा त्याला बरेच जण लहान मुलगा समजायचे. पण प्रतिस्पर्ध्यांचा हा समज सचिनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर दूर केला.

सचिन आचरेकर सरांना विसरू शकत नाही…

maharashtra times

रमाकांत आचरेकर सरांनी सचिनला घडवले. सचिनला क्रिकेटसाठी त्यांनी शाळा बदलायला लावली. त्याचबरोबर सचिनवर त्यांनी क्रिकेटचे संस्कार केले. आचरेकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच सचिन महान क्रिकेटपटू होऊ शकला. त्यामुळेच सचिनही त्यांना कधीच विसरू शकत नाही.

सचिन-विनोदची जोडी…

maharashtra times

सचिन आणि विनोद कांबळी हे जुने मित्र. या दोघांनी मैदानही चांगलेच गाजवले. शालेय स्पर्धेतील त्यांचा विक्रम पाहण्यासारखा होता. त्यामुळे जेव्हा सचिनचे नाव घेतले जाईल, तेव्हा आपसूकच कांबळीचेही नाव लोकांना आठवेल, हे मात्र नक्की.

हे क्षण सचिन कधीही विसरू शकणार नाही…

maharashtra times

सचिन एक फलंदाज म्हणून ग्रेट होताच, पण एक व्यक्ती म्हणूनही मोठा होता. त्यामुळेच सचिनने आपल्या घरचे संस्कार जपले. त्यामुळे सचिन हा क्रिकेटपटूपेक्षा मोठा होऊ शकला. सचिनने घरच्यांसाठीही बऱ्याच गोष्टी केल्या. हे काही क्षण सचिन कधीही विसरू शकणार नाही.

… अन् सचिनने विश्वचषक उंचावला

maharashtra times

देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सचिनने पाहिले होते. हा योग जुळून आला तो २०११ या साली. २०११ साली भारताने विश्वचषक जिंकला आणि सचिनचे स्वप्न पूर्ण झाले.

सचिन हा दिवस विसरू शकणार नाही…

maharashtra times

सचिनने २०१३ साली निवृत्ती घेतली. त्यामुळे हा दिवस सचिन कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी भारतीय खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडियमची एक फेरी मारली होती.

अन् सचिन झाला भावूक…

maharashtra times

सचिन असाच एकदा गांगुलीच्या घरी जेवायला गेला होता आणि त्या आठवणी सचिनने एका फोटोच्या माध्यमातून पुन्हा जागृत केल्या. हा फोटो शेअर करून सचिन थोडासा भावूक झाला. कारण या जुन्या आठवणींमध्ये तो पुन्हा एकदा रमला. सचिन म्हणला की, ” गांगुलीच्या घरी एका सायंकाळी काढलेला हा फोटो आहे. गांगुलीच्या घरी त्याची आई आणि कुटुंबिय चांगले पदार्थ आम्हाला खायला द्यायचे आणि चांगले आदरतिथ्य करायचे. मला आशा आहे की, गांगुलीच्या आईची तब्येत अजूनही चांगली असेल, माझ्या तिला शुभेच्छा.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

truck bike accident in aurangabad: ट्रकची धडक; दोन तरुण ठार – two young man died in truck and bike accident in aurangabad

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडली.  Source link

Sanjay Chavan: ‘ती’ जमीन सरकारकडे जमा करा – tehsildar shubham gupta has directed that land should be in the name of the government to...

म. टा. वृत्तसेवा, सटाणाबागलाणचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण हे आदिवासी नसल्याने त्यांना आदिवासींकडून खरेदी केलेल्या तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील उमाजी नगर येथील सातबाऱ्यावरील...

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

Recent Comments