Home देश srinagar delhi flight: श्रीनगरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकलं विमान अन् २३३ प्रवशांना... -...

srinagar delhi flight: श्रीनगरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकलं विमान अन् २३३ प्रवशांना… – srinagar delhi flight was held back at srinagar after it came in close contact with the snow


श्रीनगरः श्रीनगर विमानतळावर बुधावरी दिल्लीला जाणारं इंडिगोचं विमान ( srinagar delhi flight ) एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावलं. धावपट्टीला लागून असलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्याला विमान धडकलं. यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर ( IndiGo airlines ) काढण्यात आलं. यावेळी विमानात २३३ प्रवासी होते. या घटनेत कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

या घटनेनंतर विमानाची तपासणी करण्यात येत असल्याचं विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं. विमान बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होतं. पण विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांना संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढलं.
गेल्याच महिन्यात विमानाचा ताफ्यात समावेश

नवीन A321neo विमान व्हीटी-आययूझेडचा गेल्या महिन्यात विमानाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. इंडिगो फ्लाईट 6E 2559 बुधवारी दुपारी त्याच विमानाने दिल्लीहून निघाली होती. पण अपघातामुळे श्रीनगरमध्ये हे विमान थांबवावं लागलं.

हवाई दलाला मिळणार ८३ तेजसचं बळ, ४८ हजार कोटींची डील

‘मुलींमध्ये १५ व्या वर्षीच माता होण्याची क्षमता विकसित होते’, काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

श्रीनगरमधील तापमान उणे ७.८ अंशांपर्यंत घसरले

श्रीनगर तापमानात सातत्याने घट होत आहे. डोंगरांवर हिमवृष्टी सुरूच आहे. पारा उणे ७.८ अंशांपर्यंत खाली गेला आहे. यामुळे येथील डल लेक गोठला आहे. रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिका कर्मचारी सातत्याने रस्त्यांवरील बर्फ हटवत आहेत. हिमवृष्टी सुरूच आहे. पुढील दहा दिवस अशीच परिस्थिती कायम राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia Scorecard: Australia All Out On 294 Runs On Day 4 Of 4th And Final Test In Brisbane, India Required 324 Runs...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने...

farmers protest: farmers protest : शेतकरी आणि सरकारमध्ये आता बुधवारी बैठक; कृषीमंत्री बोलले… – farmers protest farm laws agriculture minister narendra singh tomar

नवी दिल्लीः आंदोलनकारी शेतकरी संघटनांसह ( farmers protest ) सरकारची चर्चेची दहावी फेरी आता बुधवारी २० जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ही चर्चा १९...

Recent Comments