Home आपलं जग करियर SSC: स्टाफ सिलेक्शन कमिशनने परीक्षांसंदर्भात दिली 'ही' माहिती - ssc cgl and...

SSC: स्टाफ सिलेक्शन कमिशनने परीक्षांसंदर्भात दिली ‘ही’ माहिती – ssc cgl and other exam dates to be announced after lockdown


स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांसंदर्भात आयोगाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सीएचएसएल २०१९ टिअर १, ज्युनिअर इंजिनीअर पेपर १ २०१९, स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी, सीजीएल २०१८ ची स्कील टेस्ट आणि अन्य परीक्षांचं शेड्युल लॉकडाऊन संपल्यानंतर जारी केलं जाणार आहे.

उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षांच्या तारखांच्या घोषणा परीक्षेच्या किमान एक महिना आधी जारी केली जाणार आहे. परिपत्रकात असंही सांगितलं आहे की देशभर लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यासंबंधी केंद्र सरकार जे निर्णय घेत आहे, ते ध्यानात घेऊन त्यानुसार परीक्षांच्या वार्षिक कॅलेंडरचा आढावा घेतला जाईल. परिपत्रकानुसार, लॉ़कडाऊन संपल्यानंतर आयोग प्रलंबित निकालाच्या तारखाची घोषणा करणार आहे. लॉकडाऊनमुळे मूल्यांकनाचे कामही पूर्ण झालेले नाही. १८ मे २०२० रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

UMANG अॅप वर मिळणार अपडेट

युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अर्थात UMANG अॅप वर स्टाफ सिलेक्शन कमिशनशी संबंधित प्रत्येक माहिती, परीक्षा, निकालासंबंधीचे अपडेट मिळणार आहेत. ज्या उमेदवारांकडे अँड्रॉइड फोन आहे, ते गुगल प्ले स्टोरमध्ये आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोरवर जाऊन हा अॅप डाऊनलोड करता येईल. UMANG व्यतिरिक्त SSC संबंधीची सर्व माहिती ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध असेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Mira-Bhayandar Municipal Corporation: मीरा-भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा झटका – court asks question to mira-bhayandar municipal officers over delayed the process of making appointments of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमीरा-भाइंदर महापालिकेत चार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून ती...

Recent Comments