Home आपलं जग करियर SSC CGL Tier 1 Results: SSC CGL Tier-I परीक्षेचा निकाल जाहीर -...

SSC CGL Tier 1 Results: SSC CGL Tier-I परीक्षेचा निकाल जाहीर – ssc cgl tier 1 results declared by staff selection commission


SSC CGL Tier-I Result: स्टाफ सिलेक्शन कमिशनने सीजीएल (कम्बाइन्ड ग्रॅच्युएट लेवल) टियर १ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर हा निकाल पाहता येणार आहे. उमेदवार या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल जाणून घेऊ शकतात. सीजीएल टियर १ परीक्षेत ८,९५१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. सीजीएल टियर १ परीक्षेचं आयोजन ३ मार्च २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत करण्यात आले होते. एकूण ९ लाख ७८ हजार १०३ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

टियर १ परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना टीयर २ आणि टियर ३ परीक्षा देण्यासाठी शॉर्टलिस्ट केले गेले आहे. सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकीय अन्वेषक, ग्रेड २ आणि अन्य सर्व पदांसाठी वेगवेगळी कट ऑफ ठरवण्यात आली आहे.

उमेदवार निकाल पाहण्यासाठी या थेट लिंकवर क्लिक करू शकतात.

– आता एक पीडीएफ उघडेल, तेथे आपला रोल नंबर सर्च करा.

– जर तुमचा रोल नंबर या यादीत असला की समजावे तुम्ही उत्तीर्ण झाला आहात.

टीयर १ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर २ परीक्षा द्यावी लागते. CGL टिअर २ परीक्षा १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा: UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

एनसीईआरटीत नोकरभरती; २६६ जागा रिक्त

पात्र / अपात्र उमेदवारांचे गुण, अंतिम उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका ७ जुलै २०२० रोजी संकेतस्थाळवर प्रसिद्ध होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Nawab Malik: Nawab Malik: लोकल सुरू करायला राज्य सरकार तयार!; ‘या’ मंत्र्याचा गोयल यांच्यावर आरोप – restore local train service in mumbai says nawab...

मुंबई: 'मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकलसेवा सुरू करण्यात यावी', अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री...

Recent Comments