Home शहरं मुंबई st mahamandal: एसटी पुन्हा एलएनजीच्या दिशेने - st again in the direction...

st mahamandal: एसटी पुन्हा एलएनजीच्या दिशेने – st again in the direction of lng


‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

भविष्यात एसटीला आर्थिक उभारी देण्यासाठी एसटी महामंडळाने पुन्हा एकदा लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या (एलएनजी) दिशेने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘एलएनजी’वर सर्व एसटी चालवण्याची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प अडगळीत गेला. यामुळे ‘एलएनजी’कडे वळण्याचा निर्णय म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणल्याचा प्रकार असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

एसटी महामंडळाला आर्थिक बळकटी देण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई सेंट्रल मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात खर्चात कपात करण्यासह अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर चर्चा झाली.

सध्या एसटी महामंडळामध्ये १८,५०० बस आहेत. या सर्व बस डिझेलवर धावतात. एसटीच्या एकूण महसुलाच्या ३४ टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होते. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १२०० बस एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येतील, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

एसटीकडे सध्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांमध्ये एसटी बसेसची पुनर्बांधणी करण्यात येते. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खासगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली आहे. खासगी वाहनधारकांना बस बांधणीसाठी एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केला जाणार आहेत.

एसटी महामंडळाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने व्यवहारिक योजना तयार करण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती हा देखील एक पर्याय आहे. मात्र, तो सध्या चर्चेच्या स्तरावर आहे.- अनिल परब, परिवहन मंत्री आणि अध्यक्ष एसटी महामंडळ

७२ लाखांचे उत्पन्न

एसटीने सुरू केलेल्या मालवाहतुकीने महिनाभरात १,९०७ फेऱ्यांद्वारे सुमारे ७२ लाखांची कमाई केली. डिसेंबर २०२१अखेर सुमारे दोन हजार मालवाहू वाहने तयार करून त्यातून सुमारे २५० कोटी रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments