Home मनोरंजन steve bing commits suicide: निर्मात्याने केली आत्महत्या, २७ व्या मजल्यावरून मारली उडी...

steve bing commits suicide: निर्मात्याने केली आत्महत्या, २७ व्या मजल्यावरून मारली उडी – Hollywood Producer Steve Bing Commits Suicide


न्यूयॉर्क- बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. आता हॉलिवूडमधूनही अशीच एक दुःखद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड निर्माते स्टीव बिंग यांनी आत्महत्या केली. स्टीव यांनी २७ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ते ५५ वर्षांचे होते. स्टीवच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असं म्हटलं जातं की, स्टीव काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होते. याचमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं.

स्टीव बिंग करोना व्हायरसमुळे आयसोलेशनमध्ये होते. याच काळात ते नैराश्यग्रस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी साधारण १ वाजता त्यांनी लॉस एन्जेलिस येथील सेन्चुरी सिटीमधील एका लग्झरी अपार्टमेन्टच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

भारतातले ‘हे’ दिग्दर्शक आहेत सर्वात महागडे

२००१ मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल एलिजाबेथ हर्लेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. स्टीव बिंग यांना दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे बिंग यांना त्यांच्या १८ व्या वाढदिवसाला आजोबा टायकून लिओ एस बिंग यांच्याकडून जवळपास ६०० मिलिअन डॉलरची संपत्ती मिळाली होती. स्टीव बिंग यांनी ‘गेट कार्टर’, ‘एवरी ब्रेथ’, ‘द पोलर एक्सप्रेस’ या सिनेमांची निर्मिती केली होती.

वेषभूषाकार नंतर दिग्दर्शक झालेले जोल शूमाकर यांचंही सोमवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी लढत होते. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बॅटमॅन सिनेमासोबतच सेन्ट एल्मोज फायर आणि फॉलिंग डाउन या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments