Home मनोरंजन subodh bhave storytelling: 'सुबोध दादाच्या गोष्टी'ची पंचविशी - subodh dada chi goshta...

subodh bhave storytelling: ‘सुबोध दादाच्या गोष्टी’ची पंचविशी – subodh dada chi goshta on youtube complete 25 episode


सुबोध भावे, अभिनेता

माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबांकडून मी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे मला स्वत:ला गोष्ट ऐकायला खूप आवडतं. आजकाल लहान मुलांना गोष्टी सांगणारं कुणी नाहीय हे मला जाणवलं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू असताना माझ्या लक्षात आलं की डिजिटल माध्यमावर लहान मुलांसाठी गोष्टीरुपानं फारसं साहित्य उपलब्ध नाहीय. जे आहे त्यातलं जास्त हे अॅनिमेटेड स्वरुपात आहे. पण, स्वत: कुणीतरी आपुलकीनं गोष्ट सांगतोय असा व्हिडीओ मला तरी दिसला नाही. म्हणून सेटवर असताना काही गोष्टी मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केल्या आणि युट्यूबवर पोस्ट केल्या. पण, त्या हव्या तितक्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. मग नचिकेत खासनीस आणि इतर टीम यांच्याबरोबर बोलणी झाल्यानंतर असं ठरलं, की आपण त्याचा नीट व्हिडीओ करुन गोष्टी सांगायला सुरुवात करु या. दर शनिवारी सकाळी ११ वाजता आपण एक गोष्ट सांगायची आहे. त्यानुसार गोष्टी वाचायला, शोधायला सुरुवात केली. नुकतंच आम्ही या उपक्रमाचा २५वा भाग ऑनलाइन साजरा केला.
सेटवर नो एन्ट्री ; तरी ज्येष्ठ कलाकार टीव्हीवर
काही विशिष्ट तात्पर्य असलेल्या, काही विनोदी ढंगाच्या, कधी बोधपर, कधी इसापनीतीमधल्या तर कधी विक्रम-वेताळच्या अशा विविध प्रकारच्या गोष्टी निवडून मी गोष्टींमधलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. मराठी भाषेतल्या गोष्टींबरोबरच इतर भाषांतल्या गोष्टीही मराठीत भाषांतरित करुन त्या मी मुलांना ऐकवल्या. लहान मुलांना या गोष्टी खूप आवडताहेत. दर शनिवारी सांगितलेल्या गोष्टीवरुन आम्ही मुलांना चित्र काढायला सांगतो. आठवडाभर आम्हाला खूप सारे मेल्स येत असतात. अनेक लहान मुलं शनिवारची आतुरतेनं वाट बघत असतात. आठवडाभर थांबायला नको म्हणून आम्ही आता दर बुधवारी मुलांची सर्जनशीलता दाखवतो. त्यात आम्हाला मुलांनी पाठवलेली चित्रं, गायलेली गाणी, वाद्यं वाजवलेले व्हिडीओ असं आम्ही त्या दिवशी युट्यूबवर पोस्ट करतो. हे बघून मुलांचा उत्साह द्विगुणित होतो. आम्हाला जवळपास रोज शंभरएक चित्रं येत असतात. काही शाळांमध्ये मुलांना एकत्र बसून प्रोजेक्टरवर आमचे व्हिडीओ दाखवण्यात आले. आता काही मुलांनी स्वत: गोष्टी लिहून त्या विविध ठिकाणी सादर केल्यात. आजच्या लहान मुलांमध्ये आपण गोष्टींची आवड निर्माण करू शकलो याचं आम्हाला प्रचंड समाधान वाटतंय.

१० वर्षांचा संसार मोडला;’या’ अभिनेत्रीच्या भावासोबत झालं होतं शर्मिष्ठाचं पहिलं लग्न
खरं तर ‘सुबोधदादाच्या गोष्टी’चा पंचविसावा भाग आम्ही मुलांना प्रत्यक्ष भेटून एखाद्या हॉलमध्ये धुमधडाक्यात साजरा करायचा असं ठरवणार होतो. पण, लॉकडाउन आणि करोनाच्या भीतीमुळे ते शक्य झालं नाही. पण, आम्ही झुमवर भेटलो. या लाइव्ह सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्याकडे २५० लहान मुलांचे मेल्स आले होते. त्यातून आम्ही काहींची निवड केली. अडीच वर्षांपासून १० वर्षांपर्यंतची, फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातलीच नव्हे, परदेशातूनही अनेक लहान मुलं या सेशनमध्ये सहभागी झाली होती. मला खरंच कौतुक वाटतं, की संपूर्ण अडीच तास एका जागी बसून या मुलांनी प्रत्येकाची गोष्ट ऐकली. सगळ्या मुलांच्या पालकांचंदेखील मला कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या मातृभाषेशी या मुलांची नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. सातासमुद्रापार असूनही अनेक पालकांनी मराठी भाषेशी आपल्या मुलांची छान ओळख करुन दिली आहे.

या प्रोजेक्टनं मला काय दिलं, तर प्रचंड आनंद मिळाला. आता मला गोष्टी सांगणारं कोणी नाहीय. पण, मला स्वत:ला गोष्टींमध्ये रमायला अतिशय आवडतं. सिनेमाची कथासुद्धा मी एखाद्या गोष्टीसारखी मन लावून ऐकतो. लहान मुलं फार हुशार असतात. त्य‍ांना सगळं कळत असतं. गोष्टींमधलं तात्पर्यदेखील ते नकळत शिकतात. लहान मुलांची निरागसता पाहून त्यांना प्रोत्साहन आणि आनंद मिळतो. आता आम्ही ५० वा भाग कसा वेगळेपणाने साजरा करता येईल याचा विचार करतोय. त्यावर सध्या काम सुरू आहे.

शब्दांकन : गौरी भिडेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Ramdas Athawale Corona Positive: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना – Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive

मुंबईः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे....

Recent Comments