Home शहरं मुंबई subramanian swamy on Thackeray Sarkar: subramanian swamy: ...तर भाजपनं ठाकरे सरकारला पाठिंबा...

subramanian swamy on Thackeray Sarkar: subramanian swamy: …तर भाजपनं ठाकरे सरकारला पाठिंबा द्यावा: सुब्रमण्यम स्वामी – if congress and ncp withdraw support from thackeray sarkar bjp must come forward, says subramanian swamy


मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं आहे. ‘काँग्रेस व राष्ट्रवादीनं ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला तर भाजपनं देशहितासाठी पुढं येऊन या सरकारला पाठिंबा द्यावा,’ असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं आहे.

महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रियेवरून सरकारमधील एक प्रमुख घटक असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा होती. सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर शिवसेना व राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे, अशी काँग्रेसची भावना होती. त्या शिवाय अन्य काही तक्रारी होत्या. काही नेत्यांनी उघडपणे तसं बोलूनही दाखवलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसचं म्हणणं मांडलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारमध्ये काँग्रेस नाराज नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं. काही प्रशासकीय प्रश्नांच्या बाबतीत आमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यात वैयक्तिक मुद्दा नव्हता, असं त्यांनी सांगितलं. असं असलं तरी काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं लपून राहिलं नव्हतं.

याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्यास देशहित लक्षात घेऊन भाजपनं या सरकारला पाठिंबा द्यायला हवा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार स्थापन करायला हवं,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे. स्वामी यांच्या या ट्विटमुळं भाजप अजूनही शिवसेनेशी युती करायला तयार असल्याचं समोर आलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

Recent Comments