मुंबई : ‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिने अदिती राव हैदरी हिनं पुढे मोजकेच चित्रपट केले. ‘ये साली जिंदगी’, ‘भूमी’, ‘रॉकस्टार’, ‘मर्डर ३ असे काही निवडक चित्रपट सोडले, तर ती बॉलिवूडमध्ये फारशी रमलेली दिसली नाही. चित्रपट कमी असले, तरी तिची लोकप्रियता खूप असल्याचं पाहायला मिळतंय. ‘दासदेव’ या चित्रपटानंतर तिनं दाक्षिणात्य चित्रपटांची वाट धरली होती. अदिती लवकरच एका मल्याळम चित्रपटातही झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो व्हायरल होतोय. तो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
अभिनेत्री राधिका आपटेनं टाकलं दिग्दर्शनात पाऊल तसंच संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी झळकली. या चित्रपटात तिनं अल्लाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली. भूमिका छोटी असूनही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र, ती जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली. सध्या तिनं हलक्या-फुलक्या भूमिका नाकारायचा सपाटाच लावला आहे. मोठं बॅनर आणि ए लिस्टर सहकलाकार असतील, तरच आपण चित्रपट करू, असं तिचं म्हणणं असल्याचं कळतंय.
ट्रोल्सना म्हणते, ‘गेट वेल सून’ ! बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर काही ना काही कारणावरुन नेहमी ट्रोल होत असतात. पण हे ट्रोलर्स त्यांना एवढं का बोलतात, या प्रश्नाचं उत्तर अदितीनं दिलं आहे. तिच्या मते ते कुणावरचा तरी राग काढत असतात. अदिती म्हणाली, की ‘ या ट्रोलर्सना त्यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी अडचणी येतात. त्यामुळं वैतागलेल्या या मंडळींना आपला राग कुणावर तरी काढायचा असतो. मग ते सोशल मीडियावर येतात. ट्रोलिंग हे आजचं वास्तव आहे ज्यापासून आपण कुठेही पळ काढू शकत नाही. त्यामुळं परिस्थिती कशीही असली तरी आपण सकारात्मक असायला पाहिजे असं मला वाटतं.
मुंबई- प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव सध्या त्यांचा आगामी ‘द व्हाइट टायगर’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने सोमवारी एक बिहाइंड द सीनचा...
मुंबई- भारतीय संघाने मंगळवारी ब्रिस्बेनच्या गाबा येथे चौथा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकत इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर खेळाडूंवर अभिनंदनाचा पाऊस पडत...
ब्रिस्बेन, IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात बरेच रंजक किस्से पाहायला मिळाले. यामध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत सामना सुरु असताना मैदानात गाणं...
मुंबई: राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी...