Home शहरं अमरावती Suicide in Isolation Ward: करोनाची भीती ठरतेय जीवघेणी! विलगीकरण कक्षात युवकाची गळफास...

Suicide in Isolation Ward: करोनाची भीती ठरतेय जीवघेणी! विलगीकरण कक्षात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या – 29 year old youngster hang self in isolation ward at amravati


अमरावती:करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे तीन वाजताच सुमारास घडली. अजमद खाँ सत्तार खॉ (२९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

वाचा: बेसुमार बिल आकारणाऱ्या सोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा ‘असा’ दणका

नांदगाव खंडेश्वर येथे एक व्यक्ती दिनांक २५ जून रोजी करोना पॉझिटिव्ह आढळला होता. सदर व्यक्तींच्या संपर्कात काही नागरिक आले होते. त्यामुळे प्रशासनाने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय वसतिगृहात सदर व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण केले होते. या विलगीकरण कक्षात गेल्या दोन दिवसापासून १६ संशयीतांचे विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु आज दिनांक शनिवारी सकाळी विलगीकरण कक्षातील इतरांना अजमद खा याने कक्षाबाहेरील खिडकीला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही बाब सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अजमद खाँ सत्तार खॉ याने स्वतःजवळच्या ओढणीने फाशी घेतली होती. विलगीकरण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

वाचा: राज ठाकरेंच्या घरात करोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्यांना लागण

पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. युवकाचा मुतदेह शवविच्छदना करिता पाठविण्यात आला. तत्पूर्वी घटनेचे गांभीर्य बघता उपविभागीय महसूल अधिकारी मनीष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी एस. डी. पी. ओ पुनम पाटील, तहसिलदार प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, नगर पालिका मुख्याधिकारी मिनाक्षी यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव इंगळे, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, ठाणेदार उदय सोयस्कर, सह विलगीकरण कक्षाचे प्रमोद ढवळे, एस.पी सुर्यवंशी, विकास दबडगे, अभिजीत लोखंडे आदी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय सोयीस्कर व सहकारी करीत आहे.

वाचा: क्वॉरंटाइन होण्यास नकार; १८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा

राज्यात करोनाच्या रुग्णांचे आकडे जसजसे वाढत आहेत, तशी या आजाराची भीतीही वाढत आहे. याच भीतीतून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मानसिक नैराश्यामुळे देखील असे प्रकार घडत असल्यानं राज्य सरकारनं समुपदेशनासाठी हेल्पलाइनही जारी केली आहे. त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्यानं चिंता वाढली आहे.

Live: राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ८० हजारच्या उंबरठ्यावरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments