Home शहरं औरंगाबाद superintendent of police: खळबळ; पालिका प्रशासक, पोलिस अधीक्षक क्वारंटाइन - municipal administrator,...

superintendent of police: खळबळ; पालिका प्रशासक, पोलिस अधीक्षक क्वारंटाइन – municipal administrator, superintendent of police quarantine


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या घरातील स्वयंपाक्यास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाण्डेय, त्यांची पत्नी ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहा वर्षांचा मुलगा व कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दोन्ही अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या लाळेचे नमुने चार दिवसांनंतर घेतले जाणार आहेत.

पाण्डेय हे पत्नी पोलिस अधीक्षक पाटील यांच्या सिडकोतील शासकीय निवासस्थानीच राहतात. तेथे घरकामासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. येथील सर्व कर्मचाऱ्यांचे महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (२३ जून) स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल बुधवारी (२४ जून) प्राप्त झाल्यानंतर एका स्वयंपाक्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्या स्वयंपाक्यास महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर पाण्डेय, त्यांच्या पत्नी सहा वर्षांचा मुलगा व इतर कुटुंबियांना क्वारंटाइन केल्याची माहिती त्यांनी दिली.

पालिकेत खळबळ
करोना प्रादुभार्वामुळे पालिकेचे प्रशासकच क्वारंटाइन झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासकांना किमान १४ दिवस क्वारंटाइन होऊन घरीच राहावे लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नसणार हा मुख्य खेळाडू – ind vs eng pacer jasprit bumrah expected to miss odi series against...

हायलाइट्स:भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहेटी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहेआता वनडे मालिकेसाठी देखील त्याला विश्रांती दिली जाण्याची...

मराठी सिनेसृष्टीचं नुकसान भरुन निघणार का? ८३ सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज – will the loss of marathi cinema be compensated? 83 movies ready for release

गेल्या वर्षभरात झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं? हा प्रश्न सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना पडला आहे. तसाच तो मराठी मनोरंजनसृष्टीला देखील पडला आहे. यापूर्वी सिनेसृष्टीचं...

एटीएम कार्डाची चोरी; मग दारूची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, इंदिरानगरमधील महिला दुकानदाराचे लक्ष विचलित करीत त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि एटीएम कार्डवर डल्ला मारला. यानंतर तब्बल १७...

Recent Comments