Home देश supreme court news: राजधानीत एन्ट्रीसाठी हवा 'कॉमन पास', न्यायालयाचे निर्देश

supreme court news: राजधानीत एन्ट्रीसाठी हवा ‘कॉमन पास’, न्यायालयाचे निर्देश


नवी दिल्ली : दिल्ली एनसीआर (National Capital Region)चे नागरिक सध्या सीमा सील केल्यानं हैराण झाले आहेत. या नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. सीमा सील केल्यानं एनसीआरचे लोक दिल्लीत दाखल होऊ शकत नाहीत किंवा दिल्लीत असणारे लोक बाहेर जाऊ शकत नाहीत. यावर दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारनं यावर तोडगा काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. दिल्ली-एनसीआरसाठी केवळ एक कॉमन पास असायला हवा. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या तीनही राज्यांची मान्यता असलेला एका पास तयार करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

करोना लॉकडाऊनमुळे दिल्ली – एनसीआरच्या सीमा सील करण्यात आल्यानं त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करोनाच्या संकटा दरम्याान सीमाबंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात नुकतीच एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नागरिकांना हा पास मिळवण्यात अडचण येऊ नये यासाठी एकच ऑनलाईन पोर्टल तयार करावं लागेल. यासाठी पुढच्या एका आठवड्यात तोडगा काढण्यास न्यायालयानं बजावलंय.

हवी एकसमान नीती

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या एनसीआर क्षेत्रात येण्या-जाण्यासाठी एक सुसंगत नीतीची आवश्यकता न्यायालयानं व्यक्त केली. यासाठी सर्व राज्यांनी एकसमान नीती तयार करावी. पुढच्या आठवड्याभरात ही नीती बनवण्यासाठी तीनही राज्यांनी एक बैठक घेण्याची सूचनाही न्यायालयानं केलीय.

लोकांना अडचणीचा सामना करावा लागू नये आणि एक समान नीती तयार व्हावी, यासाठी आपण केंद्र सरकारकडून निर्देश घेऊ, असं केंद्राकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर म्हटलंय.

बहुरुपी करोना : भारतात फैलावणाऱ्या क्लेड I/A3i ची निर्मिती चीनमध्ये नाही
गरोदर हत्तीण मानवी क्रूरतेची शिकार

नागरिकांची कोंडी

करोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान उत्तर प्रदेशनं नोएडा आणि गाझियाबादच्या सीमा सील केल्या. त्यानंतर या सीमा काही काळापुरत्या उघडण्यात आल्या. परंतु, पुन्हा त्या बंद करण्यात आल्या.

हरियाणानंही गुडगाव आणि फरीदाबादच्या सगळ्या सीमा बंद केल्या आहे. काही काळ उघडलेल्या या सीमा करोना संक्रमण वाढण्याच्या भीतीनं पुन्हा बंद करण्यात आल्या.

हरियाणानं १ जूनपासून सीमेवर थोडी सूट देण्यास सांगितल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ८ जूनपर्यंत उत्तर प्रदेश आणि हरियाणा सीमा सील करण्याचे आदेश देऊन टाकले.

दिल्ली आणि एनसीआर

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांच्या शहरी भागाला ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र’ अर्थात एनसीआर म्हणून ओळखलं जातं. सामान्य परिस्थितीत या भागांतून दररोज लाखो नागरिक कामाच्या निमित्तानं, शहरांत उपचारासाठी किंवा इतर कारणासाठी ये-जा करताना दिसतात. परंतु, करोना लॉकडाऊनमुळे मात्र इथे नागरिकांची कोंडी झाली आहे.

योगी आदित्यनाथ नेपाळवर भडकले; दिला ‘हा’ इशारा
रुग्णालयानं सुटी दिल्याची थाप करोनाबाधिताच्या कुटुंबीयांना पडली भारी!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

bigg boss live updates in marathi: Bigg Boss 14 October 29 Live Updates: बिग बॉस करणार स्पर्धकांची ‘अदला -बदली’ – bigg boss 14 october...

मुंबई: बिग बॉसच्या घरात येणाऱ्या नव्या दिवसात काही तरी ट्विस्ट येताना दिसताय. स्पर्धक जे स्वत:ला या खेळातील सर्वात मोठा मास्टरमाइंड समजत आहेत, त्यांचा...

Recent Comments