Home ताज्या बातम्या supreme court on CBSC Board Exam 2020 : दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षाचं काय?...

supreme court on CBSC Board Exam 2020 : दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षाचं काय? सुप्रीम कोर्टात सुनावणी cbse board exam 2020 cbse-board will-tell-decision-on-pending exams mhkk | Career


CBSC बोर्ड परीक्षा रद्द करणार की पुढे ढकलणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली, 25 जून : CBSC बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उर्वरित परीक्षा घेण्याबाबत बोर्ड निर्णय देईल. याआधी बुधवारी संध्याकाळपर्यंत हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंडळाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. यासंदर्भात बुधवारी मंडळाने किंवा सरकारने कोणतीही घोषणा केली नाही. आज सर्वोच्च न्यायालय आज दुपारी 2 वाजता या खटल्यावर सुनावणी करणार आहे.

CBSC बोर्डाला सुप्रीम कोर्टानं विचार करून निर्णय घेण्यासाठी आठवड्याभराचा अवधी दिला होता हा अवधी उलटूनही बोर्डाकडून कोणताही निर्णय जाहीर कऱण्यात आला नाही. सीबीएसई उर्वरित दहावी आणि बारावी परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनच्या आधारे ग्रेड दिले जाऊ शकतात. ही ग्रेडिंग सिस्टम संपूर्ण देशात लागू होईल. ग्रेड देताना विद्यार्थ्यांची कामगिरी त्या पेपर्समध्ये दिसू शकेल.

हे वाचा-Covid-19 : गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी

सीबीएसईने परीक्षा पुढे ढकलल्यास किंवा ती रद्द केल्यास त्याचा वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEEच्या तारखांवरही परिणाम होईल. जेईईची मेन परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान होणार आहे, तर एनईईटी 26 जुलै रोजी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर CBSC बोर्ड परीक्षा रद्द करणार की पुढे ढकलणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 25, 2020 11:48 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nicolas sarkozy corruption: Nicolas Sarkozy Corruption भ्रष्टाचार प्रकरणी फ्रान्सच्या माजी अध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा – former french president nicolas sarkozy guilty of corruption given one...

पॅरिस: फ्रान्सचे माजी अध्य़क्ष निकोलस सरकोझी यांना पॅरिसमधील न्यायालयाने सोमवारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यांना एक वर्ष तुरुंगवास आणि निलंबित कारावासाची शिक्षा सुनावण्यात...

Kotak Mahindra Bank reduce home loan rate: आणखी एका बँंकेची व्याजदर कपात; ‘या’ बँंकेकडून मिळेल सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज – kotak mahindra bank reduce...

हायलाइट्स:मागील दोन महिने स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजी दिसून आली आहे.जास्तीत जास्त गृहकर्ज वितरण करण्यासाठी बँकांनी गृहकर्ज दरात कपात कोटक महिंद्रा बँकेने कर्ज दरात...

devendra fadnavis vs uddhav thackeray latest news: Devendra Fadnavis: फेसबुक लाइव्हमध्ये मुख्यमंत्री खरं बोलले!; करोनाबाबत फडणवीसांचा गंभीर आरोप – maharashtra budget session devendra fadnavis...

हायलाइट्स:ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न आहे!देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणावरळीत पहाटेपर्यंत बार कुणाच्या आशीर्वादाने चालतात?मुंबई: 'ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाइव्हमध्ये...

हुक्का चालकांसह १७ ग्राहकांवर गुन्हे

म. टा. वृत्तसेवा, एपीएमसी पोलिसांनी रविवारी पहाटे सत्रा प्लाझा इमारतीतील कॅफे पाम अॅटलांटिस व शक्ती आर्केड इमारतीतील रंग दे बसंती या दोन ...

Recent Comments