Home क्रीडा Suresh Raina: I Could Not Sleep For 3 Night After Dismiss On...

Suresh Raina: I Could Not Sleep For 3 Night After Dismiss On Zero In Debut Match Says Suresh Raina – पहिल्याच सामन्यात भोपळा; तीन दिवस झोपला नाही हा क्रिकेटपटू!


नवी दिल्ली: भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे अनेक क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. काही खेळाडू पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करतात आणि सर्वंचे लक्ष वेधून घेतात. पण या उटल काही क्रिकेटपटूची सुरूवात खराब होते. अशाच एका भारतीय संघातील क्रिकेटपटूने पदार्पणाच्या सामन्यातील त्याची आठवण सांगितली.

वाचा- भारताच्या या क्रिकेटपटूला येत आहे धोनीची आठवण…

भारतीय संघातील मधळ्या फळीतील धमाकेदार फलंदाज सुरेश रैनाने २००६ साली वयाच्या १८व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. राहुल द्रवीडच्या नेतृत्वाखाली रैनाला खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने ओपनिंग केली होती. पण भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रैनाला या सामन्यात चमकण्याची संधी होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

वाचा- बॉलीवूडच्या अभिनेत्रीचे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी लग्न, जाणून घ्या सत्य…

एका वृत्तपत्राशी बोलताना रैना म्हणाला, मी फार तरुण होतो आणि श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन तेव्हा दमदार फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्याच चेंडूवर मला बाद केले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे मला तीन रात्र झोप आली नाही.

वाचा- सनी लिओनीचा क्रिकेटपटूसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल

मुरलीच्या पहिल्याच चेंडूवर LBW बाद झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकात ९ बाद २०५ धावा केल्या. अर्थात रैनाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण खराब झाले तरी नंतर त्याने भारतीय संघाकडून अनेक शानदार खेळी केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता.

वाचा- चक्क मास्क लावून खेळाडू मैदानात उतरला अन् …

रैनाने भारतीय संघाकडून १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळले आहे. तो सध्या भारतीय संघात नसला तरी आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्ज संघाकडून शानदार कामगिरी करत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

world Test championship: IND vs ENG : विजयानंतरही भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो धक्का, पाहा समीकरण… – ind vs eng : if team...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी...

PM Modi: pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, ‘दलालांमुळे शेतकऱ्याची…’ – pm modi address bjp rally in coimbatore our govt that had...

कोईम्बतूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांची कोईम्बतूरमध्ये प्रचारसभा झाली. सरकार सर्व वर्गाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मी नुकताच एका कार्यक्रमातून...

Recent Comments