Home महाराष्ट्र Surgery at ACPM in Dhule: महिलेच्या पोटातून काढला तब्बल ४ किलोचा गोळा;...

Surgery at ACPM in Dhule: महिलेच्या पोटातून काढला तब्बल ४ किलोचा गोळा; धुळ्यात यशस्वी शस्त्रक्रिया – dhule: doctors at jawahar medical foundation hospital successfuly perform surgery to save patient


धुळे: येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया करून एका महिलेच्या पोटातून तब्बल ४ किलोचा गोळा काढला आहे. डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळं महिलेला जीवदान मिळालं असून तिची प्रकृती आता उत्तम आहे.

वाचा: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; भाजपनं आकडेवारीच दिली

रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसापूरतांडा येथील ४८ वर्षीय महिलेला दोन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होता. तिला वेदना असह्य झाल्या होत्या. लॉकडाउनमध्ये आपल्यावर कुठेही उपचार होऊ शकणार नाहीत, या भीतीनं तिला ग्रासलं होतं. दुसरीकडे, कॅन्सरची गाठ आहे की काय या संशयातून सदर महिलेस कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नव्हते.

पीडित महिलेस तिच्या नातेवाईकांकडून जवाहर मेडिकल फाउंडेशनची माहिती मिळाली. त्यानंतर तिने जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलशी संपर्क साधला. तपासणीअंती तिची गर्भ पिशवी व अंडाशयाला ३०x१५ सेमीची गाठ असल्याचे निदर्शनास आले. स्त्रीरोग विभागातील सर्जन डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. अमोल कोराने यांनी सदर महिलेची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी सदर महिलेवर डॉ. नितीन कुलकर्णी यांच्याकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सदर महिलेच्या पोटातून तब्बल ४ किलोचा गोळा काढण्यात आला. त्यामुळे सदर महिलेस जीवदान मिळाले आहे. या महिलेची प्रकृती आता उत्तम असून तिच्यावर रूग्णालयातच उपचार सुरू आहेत.

वाचा: आजारी असताना बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला: धनंजय मुंडे

स्त्री रोग विभागातील विभागप्रमुख डॉ. अलका पाटील, डॉ. देवयानी पाटील, डॉ. सारा शेख, डॉ. अर्जिता ठावरे, डॉ. सायली थावरे, डॉ. भाग्यश्री भदादे, डॉ. अक्षय जगताप, डॉ. स्नेहा सानप यांनी या शस्त्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. भूलतज्ञ डॉ. मानसी पानट यांनीही मोलाचे सहकार्य केले. जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

BJP: बेस्ट खासगीकरणाविरोधात भाजप आक्रमक – bjp has apposed privatization of best buses and conductor jobs recruitment on contract basis

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर आणि कंडक्टर कंत्राटी घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्टच्या खासगीकरणाच्या डावात...

Recent Comments