Home मनोरंजन sushant for education: सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा! - late actor...

sushant for education: सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा! – late actor sushant singh rajput sent children to nasa for workshop tweet viral


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत अचानक निधन पावल्याच्या धक्क्यातून अद्याप सगळे सावरलेले नाहीत. परंतु, त्यानं घेतलेली ही अकाली ‘एक्झिट’ सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतच्या निधनानं कलाविश्वावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्यानं रंगवलेल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात नक्कीच राहणार आहे. सोशल मीडियावर सुशांतबद्दल अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. तो एक चांगला अभिनेताच नव्हता तर पडद्यामागं देखील तो खूप चांगल्या गोष्टी काही करत होता. त्याचे अनेक फोटो त्याचे चाहते शेअर करत आहेत. ‘सुशांत फॉर एज्युकेशन’ या मोहिमेअंतर्गत तो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करायचा. इतकंच नाही तर त्यानं अनेक विद्यार्थ्यांना ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्रातील वर्कशॉपसाठी स्वखर्चातून पाठवलं होतं.

सुशांतनं त्याच्या ५० स्वप्नांची यादी देखील शेअर केली होती.त्यात त्यानं १०० मुलांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचं आहे, असा उल्लेख केला होता. तो त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता. २०१७मध्ये त्यानं दोन विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवलं होतं. ‘स्पेस कॅम्पस यूएसए’ यांनी ट्विट करत सुशांतचे आभार मानले होते. हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनयाशिवाय, सुशांत शिक्षण क्षेत्रासाठी काही ना काही सामाजिक काम करत होता. त्याचप्रमाणे, देशातील उद्योजकता वाढीस लागावी, यासाठीही योगदान देत होता. अशा प्रकारचे काम करणारा, यशस्वी झालेला आणि इतरांच्या चांगल्या कामांमध्ये हातभार लावणारा उमदा अभिनेता नैराश्याच्या गर्तेत सापडला तरी कसा, असा प्रश्न सगळे विचारत आहेत.
क्रिती सुशांतबद्दल खूप काही बोलत होती आणि मी फक्त ऐकत होतो; वडिलांची पहिली प्रतिक्रिया
ग्रह-ताऱ्यांमध्ये रममाण

राष्ट्रीय स्तराचा भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये विजेता ठरलेल्या सुशांतला भौतिकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात विशेष रस होता. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि न्युरोबायोलॉजीसारख्या विषयांबद्दलची त्यांची आवड; याबद्दल यापूर्वी ‘टाइम्स’ बोलताना तो म्हणाला होता की, ‘मला अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये खूप रस आहे. माझ्याकडे दुर्बिणीसुद्धा आहेत. मी त्यातून आकाशाचे निरीक्षण करत असतो. या व्यतिरिक्त मला न्युरोबायोलॉजीमध्ये देखील खूप रस आहे.’ सुशांतच्या बकेट लिस्टमध्ये त्याने चंद्र, मंगळ, बृहस्पती, शनि आदींच्या हालचालींचे मूल्यांकन आणि अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला पॉलिनेशियन खगोलशास्त्र, वैदिक ज्योतिष आणि योगक्रियांचादेखील अभ्यास करायचा होता.

१० वर्षांचा संसार मोडला;’या’ अभिनेत्रीच्या भावासोबत झालं होतं शर्मिष्ठाचं पहिलं लग्नSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in...

वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या...

leopard spotted in malegaon: कळवाडी परिसरात पुन्हा बिबट्या; दोन दिवसांत २० जनावरांचा फडशा – leopards again spotted in kalwadi area malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावतालुक्यातील कळवाडी परिसरात जनावरांना पुन्हा एकदा बिबट्याने लक्ष्य केले आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या तब्बल २० जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला....

Recent Comments