Home ताज्या बातम्या Sushant singh Rajput आत्महत्या प्रकरण, पोलीस नोंदवणार अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब |...

Sushant singh Rajput आत्महत्या प्रकरण, पोलीस नोंदवणार अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब | News


मुंबई 27 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant singh Rajput ) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. आता या प्रकरणात अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब मुंबई पोलीस नोंदविणार आहेत. सोमवारी तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या आधी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून सुशांत बद्दल बऱ्याच गोष्टी पोलिसांना कळाल्या आहेत. संजना ही सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेल्या दिल बेचारा मध्ये त्याच्या सोबत होती. आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर 24 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. सुशांतने जास्तच जवळीक दाखवत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संजनाने केला होता. Me too कँपेन दरम्यान हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

 

Tags:

First Published: Jun 27, 2020 09:03 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Banking services impacted in Maharashtra: All India Strike बँकिंग सेवा ठप्प; देशव्यापी बंदला राज्यभरातील बँक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – banking services impacted in maharashtra...

मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज राज्यातील बँकिंग कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक या...

nashik and delhi airlines service: दिल्ली विमानसेवेचे टेकऑफ – nashik and delhi airlines service starts after half and one year from nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदीड वर्षानंतर नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या विमानातून दिल्लीहून...

Recent Comments