Home ताज्या बातम्या Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी | News

Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी | News


मुंबई 28 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या आत्महत्येप्रकरणी  मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत असून सुशांत आणि आणखी कुणाचं पूर्व वैमनस्य होतं का याचाही शोध घेत आहेत. असं काही असल्यास त्याचा सुशांतच्या मानसिकतेवर काही परिणाम झाला असेल का ही शक्यताही पोलीस पडताळून पाहात आहेत. यशराज फिल्म्सची Casting Director शानू शर्मा ( shanu Sharma) हिला आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत आज माहिती दिली.

शानू शर्मा ही बॉलीवुड ची लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर आहे. तिनेच रणवीर सिंह, अर्जुन कूपर आणि वानी कपूर सारख्या नवीन कलाकारांना ब्रेक दिला होता.

शर्माने सुशांत सिंह राजपूत सोबत यशराज फिल्म्सच्या ‘‘शुद्ध देसी रोमांस’’ आणि ‘‘डिटेक्टिव व्योमकेश बख्शी’’ सारख्या चित्रपटात काम केलं होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर यशराज फिल्म्सने सुशांत सोबत झालेल्या कराराची प्रत पोलिसांना दिली आहे. पोलीस आणखी काही चित्रपट घराण्यांशी संबंधित लोकांनाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

 

Tags:

First Published: Jun 28, 2020 10:52 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments