Home क्रीडा Sushant Singh Rajput: 'मी आत्महत्येचा विचार सोडला, पण सुशांतशी बोलायचं राहून गेलं'...

Sushant Singh Rajput: ‘मी आत्महत्येचा विचार सोडला, पण सुशांतशी बोलायचं राहून गेलं’ – sushant singh rajput was a friend, wish i could talk to him: mohammed shami


प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. पण त्यांचा सामना कसा करायचा, हे ठरवायला हवे. भारताच्या एका क्रिकेटपटूच्या मनातही आत्महत्येचा विचार आला होता. पण तो डिप्रेशनमधून बाहेर आला आणि त्याने आत्महत्येचा विचार सोडला. पण दुसरीकडे मानसिक स्थिती चांगली नसताना सुशांतशी बोलायचे राहून गेले, ही खंतही या क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.

डिप्रेशनमध्ये असल्यामुळे सुशांतने आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. पण या प्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. सुशांतच्या मृत्यूमुळे देशवासियांवर शोककळा पसरली आहे. कारण सुशांतच्या सारख्या युवा अभिनेत्याने आत्महत्या करणं, हे सर्वांनाच चटका लावून गेले आहे.

सुशांत सिंग राजपूत

सुशांत जसा डिप्रेशनमध्ये आला होता, तसाच एक क्रिकेटपटूही काही दिवसांपूर्वी आला होता. कारण त्याच्या बायकोनेच त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. या क्रिकेटपटूची तक्रार पोलिस स्थानकातही करण्यात आली होती, त्याचबरोबर त्याच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी या क्रिकेटपटूच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. पण आपल्या कुटुंबियांच्या मदतीमुळे तो या सर्व परिस्थितीतून बाहेर पडला. हा क्रिकेटपटू म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी.

maharashtra times

सुशांत सिंग राजपूत आणि मोहम्मद शमी

काही महिन्यांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर गंभीर आरोप करत त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. या गंभीर आरोपांनंतर शमीची मानसिक स्थिती ढासळली होती. पण त्यानंतर आपल्या कुटुंबियांनी यामधून बाहेर पडायला मला मदत केली, असे शमीने सांगितले होते.

याबाबत शमी म्हणाला की, ” सुशांत हा माझा चांगला मित्र होता. पण त्याच्याशी संवाद साधण्याचे राहून गेले. जर त्याच्याशी संवाद साधला असला तर त्याची मानसिक स्थिती कशी आहे, याचा अंदाज मला येऊ शकला असता. काही महिन्यांपूर्वी माझीही मानसिक स्थिती ढासळलेली होती. पण यावेळी मला कुटुंबियांनी मदत केली आणि त्यामुळे आत्महत्येचा विचार करण्यापासून मी परावृत्त होऊ शकलो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये संवाद साधणे फार महत्वाचे असते. त्यामुळे बरेच प्रश्न निकाली निघू शकतात.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न : सहृदय आणि कणखर – pragati bankhele article on new zealand prime minister jacinda ardern

प्रगती बाणखेलेYou can carve your own path, be your own kind of leader.We do need to create a new generation of leadership.नव्या पिढीतलं...

Recent Comments