Home मनोरंजन Sushant Singh Rajput and Ankita Lokhande Break-up - अंकिताशी ब्रेकअप केल्याचा सुशांतला...

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande Break-up – अंकिताशी ब्रेकअप केल्याचा सुशांतला होत होता पश्चाताप


मुंबई: बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतसिंह राजपूत यानं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळं त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याचंही म्हटलं जात आहे. व्यावसायीक कारणांसोबत त्याच्या खासगी आयुष्यातही सर्व काही अलबेल नव्हतं, असा खुलासा त्याच्या बहिणीनं केलाय. तो रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीममध्ये होता की नाही हे देखील स्पष्ट होऊ शकलं नाहीए. दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांही या बातमीला कधी दुजोरा दिला नव्हता. आता सुशांतच्या डॉक्टरनं देखील तो खासगी आयुष्यातल्या चढ-उतारांमुळं निराश होता, असा खुलासा केलाय.

सुशांत ज्या मनोचिकित्सक डॉक्टरांकडे उपचार घेत होता त्या केरसी चावडा यांनी त्याच्या आयुष्यातील काही गोष्टीचा खुलासा केलाय. सुशांतनं त्यांच्याशी सहा महिन्यापूर्वी संपर्क केला होता. तेव्हा एका वर्षापासून डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. अंकिता लोखंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवस सर्व ठिक होतं. पण त्यानंतर आयुष्यात आणि त्याच्या नात्यांमध्ये स्थिरपणा आला नाही. व्यावसायीक ताण आणि नात्यांमधलीअस्थिरतायांनी तो काहीसा खचला होता. असं ते म्हणाले.
शूटिंग थांबल्यानं मराठी कलाकारांवर मासे-दूधविक्री करण्याची वेळ
‘पवित्र रिश्ता’

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून तब्बल सहा तास चौकशी

चुलत भावाने केला खुलासा:
सुशांतच्या चुलत भावानं एक धक्कादायक खुलासा केलाय. पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहामध्ये राहणाऱ्या पन्ना सिंह यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत याच वर्षी बोहल्यावर चढणार होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याची कुटुंबीयांची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलंयSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new parliament building: हा आमुचा मार्ग बिनभुयाराचा… – jata jata by chakor : new parliament building features underground tunnels in building for pm and...

अरेरे! काय हे आमचे नशीब! काय हा दैवदुर्विलास! (या शब्दाचा अर्थ काय ते आम्हाला अद्यापि कळलेले नाही. शाळेत शिकलेले मोजके शब्द स्मरणात राहिले....

raj thackeray: राज ठाकरे ‘नाणार’ प्रकल्पाच्या बाजूने; स्थानिक म्हणतात… – nanar refinery opposing leaders reaction after raj thackeray writes open letter to cm thackeray...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनाणार रिफायनरीला स्थानिक दलाल, गुजराती-मारवाडी गुंतवणूकदार, मुंबई, बांद्रा-बीकेसीसारख्या डायमंड मार्केटमधील भाजपप्रणित व्यापारी यांचे समर्थन असून नाणार कंपनीचे अधिकारी या...

International Women’s Day 2021: घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर – 82 percent of women prefer to buy house for investment : anarock survey

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे...

Recent Comments