Home मनोरंजन Sushant Singh Rajput Death: सिनेसंगीत क्षेत्रातही माफिया 'या' गायकानं केला आरोप -...

Sushant Singh Rajput Death: सिनेसंगीत क्षेत्रातही माफिया ‘या’ गायकानं केला आरोप – sonu nigam says the music industry is controlled by two mafias


मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर नवोदित कलाकारांना काम न देण्याचा मुद्दा चर्चेत आला. दरम्यान, गायक सोनू निगम यानं सिनेसंगीत क्षेत्रातही हेच सुरू असल्याकडे लक्ष वेधलं आहे.

सोनू यानं याबाबत सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘बॉलिवूडमध्ये म्युझिक माफीया आहेत. संगीत क्षेत्रात असलेले काही लोक, नव्यानं यात येऊ पाहणाऱ्या गुणवान मंडळींना आणि बाहेरच्या लोकांना काम मिळू देत नाहीत. तसंच काही मोठ्या अभिनेत्यांनी खोडा घातल्यामुळे संगीतकार आणि गायकांकडून काम काढून घेण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत’, असं तो म्हणतो.


दरम्यान,सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांना अद्याप पचवता आलेला नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या मामानंही सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं गेलं असलं, तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याच्या अकाली जाण्यामागे एखादा कट असल्याची शक्यता वर्तवली जातेय. यापूर्वीही काही अभिनेते-अभिनेत्रींचे मृत्यू संशयास्पदरित्या झाले होते. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवस त्याची यापूर्वीची मॅनेजर दिशा सालियननंही आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai local: मोबाइल नाही तर लोकलप्रवास नाही ? – local passengers association ask question to state government over mumbai local entry

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनापूर्व काळात भिन्न आर्थिक स्थिती असलेले ८० लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. यापैकी सगळ्यांकडेच अँड्राइड मोबाइल व इंटरनेटचे महागडे...

Recent Comments