Home मनोरंजन sushant singh rajput death case: सुशांत आत्महत्या प्रकरणी आता भन्साळी आणि कंगनाचीही...

sushant singh rajput death case: सुशांत आत्महत्या प्रकरणी आता भन्साळी आणि कंगनाचीही होणार चौकशी – Sanjay Leela Bhansali Kangana Ranaut Shekhar Kapur To Be Questioned By Police In Sushant Singh Rajput Case


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात सुशांतचे मित्र, कुटुंबिय, मॅनेजर आणि सिनेसृष्टीतील इतर काही जणांचा समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही आणि त्याच्यासोबत करण्यात आलेला भेदभाव ही कारणं देखील जबाबदार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता अभिनेत्री कंगना रनौट, निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि शेखर कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे.

राज्य सरकारनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ‘सुशांतच्या शवविच्छेदन अहवालातून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र, मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाचा वेगळा पैलू समोर येतोय. सिनेसृष्टीतील व्यावसायिक शत्रुत्वातून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्या अनुषंगानंही पोलीस या प्रकरणाचा तपास करतील,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानुसार आता पोलिस कंगना रनौट, संजय लीला भन्साळी आणि शेखर कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.
सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून तब्बल सहा तास चौकशी
सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असे धक्कादायक वक्तव्य कंगनानं सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे केलं होतं.या व्हिडीओमध्ये तिनं सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडला जबाबदार धरलं आहे. ‘सुशांत इतका कमकुवत नव्हता. तो लढवय्या होता. इंजिनीअरिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सुशांत मेंदूने कमकुवत कसा असू शकतो? बॉलिवूडमधील काही लोकांनी आत्महत्येचा विचार त्याच्या मेंदूमध्ये रुजवला. त्याने आत्महत्या केली नसून त्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यात आले होते. नियोजनबद्ध पद्धतीनं त्याची हत्या झाली,’ असा आरोप कंगनानं केला होता.
‘आणि म्हणे हे गुड लुकिंग आहेत’, कंगनाने शेअर केले स्टार किड्सचे फोटो
तर, सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूर यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरलं होतं. शेखर कपूर यांनी म्हटलं होतं की, गेल्या सहा महिन्यांपासून आपण दूर होतो. जे तुझ्याबाबतीत घडले त्यात तुझा दोष नाही. ‘सुशांत, तुला ज्या लोकांनी दूर लोटले आणि निराश केले, त्यांच्याबाबत मला माहीत आहे. त्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडत होतास. गेल्या सहा महिन्यांत मी तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटते, तू माझ्याशी बोलायला हवे होतेस. तुझ्यासोबत जे काही घडले, ते त्यांचे कर्म आहे, तुझे नाही,’.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठी कलाकारांकडून त्याने 'असे; उकळले पैसे

म. टा. प्रतिनिधी, : सोशल मीडियातील अकाउंट व्हेरिफिकेशन करून देतो, असे सांगून साताऱ्यातील एका तरुणाने अनेक मराठी कलाकारांना गंडा घातला आहे. कुणाल...

bacteria in home: रोजच्या वापरातील ‘या’ वस्तूंवर असतात ४०० पट जीवाणू – ear rings and watches contain 400 times more germs than toilet sheets...

लंडन: आपण कपडे स्वच्छ व धुतलेले वापरतो. मात्र, नेहमीच्या वापरातील वस्तूंची स्वच्छता करण्याकडे आपण लक्ष देत नाही. यामध्ये दागिने, घड्याळ यांचा समावेश आहे....

UPSC interview: UPSC मुलाखतीत उमेदवाराला नेसलेल्या साडीविषयी विचारला प्रश्न… दिलं ‘हे’ उत्तर – upsc interview question on sari miss india finalist candidate aishwarya sheoran

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतला अंतिम टप्पा असतो मुलाखतीचा. या मुलाखतीत समोर बसलेलं पॅनेल कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. यंदाच्या यूपीएससीच्या यशस्वी उमेदवारांमधील एक...

Recent Comments