Home मनोरंजन sushant singh rajput father: क्रिती सुशांतबद्दल खूप काही बोलत होती आणि मी...

sushant singh rajput father: क्रिती सुशांतबद्दल खूप काही बोलत होती आणि मी फक्त ऐकत होतो; वडिलांची पहिली प्रतिक्रिया – sushant singh’s father talks about kriti sanon and ankita lokhande


मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतचं असं अचानक जग सोडून जाणं यापेक्षा मोठं दु:ख त्याच्या कुटुंबियांसाठी आणि चाहत्यांसाठी असूच शकत नाही. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, मात्र त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. बारा दिवसांनतर त्याचे वडील केके सिंह यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी सुशांतवर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.पण बॉलिवूडमधील मोजक्याच मंडळींची इथं उपस्थिती पाहायला मिळाली होती. तसंच फक्त क्रिती सॅनन हिनं सुशांतच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं होतं. ‘अंत्यसंस्काराच्या वेळी खूप जण आले होते. पण फक्त क्रिती माझ्याशी येऊन बोलून गेली, मी जास्त काही बोलू शकलो नाही, पण ती बोलत होती आणि मी ऐकत होतो’, असं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. ‘सुरुवातील मला नक्की कोण आहे समजलं नव्हतं कारण तिनं मास्क घातला होता. कोणीतरी मला सांगितलं की क्रिती आहे. सुशांतबद्दल खूप काही बोलत होती..’, असंही ते म्हणाले.

‘अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंकिता लोखंडे हिनं देखील घरी येऊन भेट घेतली…ती इथं पाटणाला पण एकदा आली होती भेटायला’, असंही सुशांतच्या वडिलांनी सांगितलं. तसंच’अनेक वर्ष देवाला साकडं घातल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. जवळपास तीन वर्ष आम्ही देवाकडं प्रार्थना केली होती. चार मुलींनंतर तो एक मुलगा होता’, असं त्यांनी सांगितलं.
बर्थडे बॉय अर्जुन कपूर आणि मलायकाची लव्हस्टोरी

सुरुवातली सुशांत सगळ्या गोष्टी सांगायचा, पण नंतर तो घरातील कोणालाच काही सांगत नव्हता. त्याला असणाऱ्या टेन्शनबद्दलही त्यानं काही सांगितलं नाही.लग्नाबद्दलही त्याच्याशी बोलणं झालं होतं. २०२१मध्ये लग्नाचं बघू असं त्यानं सांगितलं होतं. सध्या करोनाचं वातावरण असल्यानं लग्नाचं प्लानिंग सध्या नाही करू शकत. करोना गेल्यानंतर बघू असं तो म्हणाला होता. पण रिया बद्दल त्यानं काही सांगितलं नव्हतं’,असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
सुशांतचे वडील म्हणाले, तीन वर्षांच्या प्रार्थनेनंतर जन्मलेला सुशांत
दरम्यान, सुशांतच्या पाटण्यातील घरी शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह मुलाच्या फोटोच्या समोर बसलेले दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं म्हणजेच सुशांतच्या आईचं निधन झालं होतं. आता मुलानंही साथ सोडल्याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवछत्रपती आणि नेताजी

यांच्या १२५व्या जयंतीचा समारोह पुढील वर्षी होणार असला, तरी तो आत्ताच गाजतो आहे. केंद्र सरकारने एक बहुपक्षीय बडी समिती राष्ट्रीय स्तरावर स्थापली...

robbery in domestic women worker house: मोलकरणीच्या घरात ८१ हजारांची चोरी – 81000 rupees thieves from house of domestic women worker in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादधुणी-भांडी करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालविणाऱ्या महिलेचे घरफोडून मोबाइलसह रोख रक्‍कम असा सुमारे ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्याला जिन्सी पोलिसांनी...

Recent Comments