Home मनोरंजन Sushant Singh Rajput Father Heartbreaking Pic - हृदय पिळवून टाकणारा क्षण; सुशांतच्या...

Sushant Singh Rajput Father Heartbreaking Pic – हृदय पिळवून टाकणारा क्षण; सुशांतच्या वडिलांचा फोटो करतो हताश


पटणा-सुशांतसिंह राजपूत आज आपल्यात नाही हे सत्य मनाला अजूनही पटत नाही. सतत हसणारा आणि लोकांना जगण्याची आशा देणाऱ्या सुशांत कसा आणि कधी नैराश्यग्रस्त झाला ते त्याच्या जवळच्या व्यक्तींनाही कळले नाही. त्याच्या निधनानंतर फक्त कुटुंबियांनाच नाही तर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पटणामध्ये त्याच्या राहत्या घरी सुशांतसाठीच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर शोकसभेतील सुशांतच्या वडिलांची हतबलता दाखवणारा फोटो व्हायरल होत आहे.

सुशांतच्या शोकसभेला भोजपूरी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार गेले होते. यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही सुशांतच्या वडिलांची भेट घेतली होती. या शोकसभेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यातील सुशांतच्या वडिलांचा हा फोटो मन सुन्न करणारा आहे.

आत्महत्या केली असती तर सुशांतनं चिठ्ठी लिहून ठेवली असली; शेखर सुमनचं ट्विट

या फोटोत सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह मुलाच्या फोटोच्या समोर बसलेले दिसत आहेत. काळजाचा तुकडा कायम स्वरूपी लांब गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. त्यांच्या डोळ्यातली वेदनाच सर्व काही सांगून जाते. एका वडिलांसाठी मुलाच्या जाण्याचं दुःख कोणीही समजण्याच्या पलिकडे आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केली असून त्याची हत्या झालेली नाही. सुशांतचा हा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला आहे. अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरून झाला.

विसरा रिपोर्टची वाट पाहत आहेत पोलीस

रिपोर्ट्सनुसार सुशांतसिंह राजपूत चा विसरा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र फॉरेन्सिंग विभागाला ही चाचणी लवकरात लवकर करावी असं सांगितलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापूर्वी सुशांतची हत्या केल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सुशांतसिंहचा शेवटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला

आतापर्यंत घेतले २३ लोकांचे जबाब

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्र- परिवार, मॅनेजर, टीम मेंबर, घरात काम करणारे कर्मचारी आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसह अनेकांचे जबाब घेतले आहेत. यशराज फिल्म्सकडून सुशांतची कॉन्टॅक्ट कॉपीही घेतली जी २०१२ मध्ये सुशांतने साइन केली होती. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब अजून आलेला नाही. सुशांतच्या सीएचीही चौकशी यावेळी करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sunil Gavaskar: IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान – ind vs eng : indian former...

अहमदाबाद, IND vs ENG : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि...

Kareena Kapoor Khan New Photos From Home Saif Ali Khan – स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो | Maharashtra...

हायलाइट्स:हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूरदुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक२१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्ममुंबई-करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा...

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

Recent Comments