Home मनोरंजन Sushant Singh Rajput Father Wanted Sushant To Take A Degree - कोट्यधीश...

Sushant Singh Rajput Father Wanted Sushant To Take A Degree – कोट्यधीश होऊनही शेवटपर्यंत वडिलांची एक इच्छा पूर्ण करू शकला नाही सुशांत


मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आज आपल्यात नाही. अभ्यासापासून ते अभिनयापर्यंत अनेक गोष्टीत सुशांत अग्रणी होता. शेवटच्या वर्षाला असताना सुशांतने इंजीनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि अभिनयाची वाट धरली. यानंतर त्याने मालिकांमधून आपल्या करिअरला सुरुवात करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी फार पटापट झाल्या आणि त्याने हे जगही फार लवकर सोडलं.

आजीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो होता सुशांत

इंजीनिअरिंग सोडून अभिनयाकडे वळण्याचा केला निश्चय

सुशांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने इंजीनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना शिक्षण सोडलं आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्याने सुरुवात केली. ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेत त्याला अभिनय करण्याची पहिल्यांदा संधी मिळाला. यानंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. जेव्हा सुशांतला टीव्ही सिनेसृष्टीमधून भरभरून प्रसिद्धी मिळाली यानंतर त्याने बॉलिवूडकडे आपलं लक्ष वळवलं. सुशांतने एकट्याच्या हिंमतीवर हे सारं काही करून दाखवलं होतं. याचा त्याच्या वडिलांना अभिमान होता. असं असतानाही मुलाने इंजीनिअरिंगची डिग्री घ्यायला हवी होती असंही त्यांना नेहमी वाटत होतं.

इथे पाहा सुशांतच्या कधीही न पाहिलेल्या आठवणी

२००६ मध्ये घरच्यांना दिला मोठा धक्का

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुशांत म्हणाला होता की, ‘२००६ ची गोष्ट आहे. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. जेव्हा मी घरी माझा निर्णय सांगितला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कोणीही काही बोललं नाही आणि मी त्याला होकार समजला. माझ्या वडिलांना माझा अभिमान आहे पण आजही जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा नेहमी शेवटी ते हेच सांगतात की, डिग्री पूर्ण करायला हवी होती.’

‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’ (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

‘तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gold price today: Gold Rate Today सोने तेजीत ; सलग दुसऱ्या सत्रात सोने दरात वाढ – gold price surge second consecutive day

मुंबई : कमॉडिटी बाजारात बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सोने ३१० रुपयांनी महागले. सोन्याचा...

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Recent Comments