Home मनोरंजन sushant singh rajput suicide: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा! -...

sushant singh rajput suicide: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा! – sushant singh rajput police investigation probes if actors bathrobe belt was first used for hanging


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणी आता आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांतच्या कपाटात एक हिरव्या रंगाचा कुर्ता होता. त्यानं त्याचं कापडानं गळफास घेतला होता. पण आता याच संदर्भात एक खुलासा करण्यात आलाय. तो म्हणजे सुशांतनं आणखी एका पट्ट्याच्या साहाय्यानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतनं ज्या बेडरुममध्ये आत्महत्या केली त्या बेडरुममध्ये पोलिसांना त्याच्या बाथ रोबचे काही तुकडे मिळाले आहेत.

सुशांत आत्महत्या प्रकरणी रोहिणी अय्यरची तब्बल नऊ तास चौकशी
सुशांतनं बाथ रोबच्या बेल्टच्या साहाय्यानं गळफास लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो बाथरोबचा बेल्ट तुटला. त्यामुळं त्यानं कपाटातून त्याचा हिरव्या रंगाचा कुर्ता काढला आणि गळफास लावून घेतला. असा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिस जेव्हा सुशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या बहिणीनं आणि मित्रानं तो हिरवा कुर्ता कात्रीनं कापून त्याचा मृतदेह खाली उतरवला होता. असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच त्यानं फास लावून घेतलेल्या हिरव्या रंगाचा कुर्ता देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला असून त्यामध्ये सुशांतचं व्यक्तीचं वजन उचलण्याची क्षमता होती की नाही,हे पडताळून पाहता येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा!

दरम्यान,सुशांतसिंहचा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्या केली असून त्याची हत्या झालेली नाही. सुशांतचा हा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल पाच डॉक्टरांच्या टीमनं तयार केला आहे. अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरून झाला, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार सुशांतसिंहचा तिसरा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र फॉरेन्सिंग विभागाला ही चाचणी लवकरात लवकर करावी असं सांगितलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापूर्वी सुशांतची हत्या केल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

तसेच सुशांतच्या आत्महत्येमागच्या प्रत्येक अँगलचाही शोध घेणार आहे. सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वी काही ट्विट डिलिट्स केल्याचं सांगण्यात येतं. त्या ट्विटसमध्ये त्याने नेमकं काय लिहिलं होतं? किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? या ट्विट्समध्ये कुणावर आरोप तर केले नव्हते ना? किंवा या ट्विटसमधून आत्महत्येचे संकेत तर दिले नव्हते ना? या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलीस या ट्विटसचा तपास करणार आहे. त्यासाठी ट्विटर इंडियाशी पोलीस संपर्क साधणार आहेत. या डिलिट करण्यात आलेल्या ट्विटमधून कदाचित त्याच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश पडू शकतो, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सुशांतने २७ डिसेंबर २०१९ रोजी शेवटचं ट्विट केलं होतं.

आतापर्यंत घेतले २३ लोकांचे जबाब
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्र- परिवार, मॅनेजर, टीम मेंबर, घरात काम करणारे कर्मचारी आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसह अनेकांचे जबाब घेतले आहेत. यशराज फिल्म्सकडून सुशांतची कॉन्ट्रॅक्ट कॉपीही घेतली जी २०१२ मध्ये सुशांतने साइन केली होती. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब अजून आलेला नाही. सुशांतच्या सीएचीही चौकशी यावेळी करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments