Home मनोरंजन sushant singh rajput suicide: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी 'त्या' २७ जणांचे नोंदवले...

sushant singh rajput suicide: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ‘त्या’ २७ जणांचे नोंदवले जबाब – sushant singh rajput death case mumbai bandra police has now recorded statements of at least 27 people


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू असून त्यात आतापर्यंत २७ व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्याचवेळी शवविच्छेदन अहवालात सुशांतसिंहचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून शनिवारी सुशांतसिंह आत्महत्येच्या घटनेविषयी कोणत्याही अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे गूढ निर्माण झाले असून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतसिंहच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, कयास मांडले जात आहेत. त्यामुळे हायप्रोफाइल ठरलेल्या प्रकरणात शनिवारी शवविच्छेदन अहवालही पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात सुशांतसिंहचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी स्वाक्षरी केली असल्याचे परिमंडळ ९ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी शनिवारी सांगितले.

सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा!

सुशांत आत्महत्या प्रकरणी रोहिणी अय्यरची तब्बल नऊ तास चौकशी

फॉरेन्सिक विभागाकडून तपास

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचा जबाब नोंदवून घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सुशांतच्या घरातून हस्तगत केलेल्या वस्तूंची फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही संभ्रम निर्माण करणारी माहिती न पसरविण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. सुशांतसिंह याचा बॉलिवुडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाला होता. तो करार नेमका काय आहे, हे तपासण्यासाठी त्याची प्रत पोलिसांनी मागविली होती. ही प्रत आम्हाला मिळाली असून त्याविषयी तपास सुरू असल्याचेही त्रिमुखे यांनी स्पष्ट केले.

‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’ (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे. ‘तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

स्टारकिड असतो तर बॉलिवूडमध्ये लवकर लाँच झालो असतो : आयुष्यमान खुरानाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Recent Comments