Home मनोरंजन sushant singh rajput suicide reason: सुशांतच्या चाहत्यांकडून सलमानच्या बीइंग ह्युमन स्टोअरची तोडफोड...

sushant singh rajput suicide reason: सुशांतच्या चाहत्यांकडून सलमानच्या बीइंग ह्युमन स्टोअरची तोडफोड – protests outside salman’s ‘being human’ stores in bihar in the wake of sushant singh rajput’s demise


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर मनोरंजन क्षेत्रातील घराणेशाही, गटबाजी यावरुन आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. काही जण खुलेपणानं याबाबत बोलू लागले आहेत. बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांवर थेट आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणात दबंग सलमान खान देखील दोषी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. बॉलिवूडमधील मोठ्या सहा प्रोडक्शन कंपन्यांकडून सुशांतवर बहिष्कार टाकण्यात आला होता.त्याला कुठंही काम मिळू नये यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. सुशांतला कोणत्याही मोठा बॅनरचा चित्रपट मिळू नये यासाठी सलमान देखील प्रयत्न करत होता, असा आरोप त्याच्यावर होत आहे. त्यामुळं सुशांतच्या चाहत्यांनी सलमानच्या ‘बीइंग ह्युमन’ या स्टोअरची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांवर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमध्ये असलेल्या काही गटांची मक्तेदारी आणि घराणेशाहीमुळं सुशांत सारख्या चांगल्या कलाकाराला मुकल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. यात सलमान खान, करन जोहार, यश चोप्रा आणि एकता कपूर यांच्यासहीत एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खानवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून ‘सलमान खान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्याच्या ‘बीईंग ह्युमन’ स्टोअरची तोडफोड करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

कंगना रणौतला मित्राने सांगितली सुशांतशी निगडीत धक्कादायक गोष्टी

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांना अद्याप पचवता आलेला नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या मामानंही सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं गेलं असलं, तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याच्या अकाली जाण्यामागे एखादा कट असल्याची शक्यता वर्तवली जातेय. यापूर्वीही काही अभिनेते-अभिनेत्रींचे मृत्यू संशयास्पदरित्या झाले होते. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवस त्याची यापूर्वीची मॅनेजर दिशा सालियननंही आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे.

अंकिताशी ब्रेकअप केल्याचा सुशांतला होत होता पश्चातापSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virar: महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चाकूने भोसकले; विरारमध्ये खळबळ – mumbai palghar woman stabbed an auto driver at virar

विरार: बाचाबाचीनंतर एका महिलेने रिक्षाचालकाला भर रस्त्यात भोसकले. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील विरारमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस...

PM Narendra Modi: मोदींच्या मनात का बा?; चिराग पासवानांवर एक शब्दही बोलले नाहीत मोदी – bihar election 2020 pm prime minister narendra modi did...

सासाराम:पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बिहार निवडणुकीतील (Bihar Assembly Election) एनडीएच्या प्रचारासाठी सासाराम येथे पहिली प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी केवळ...

Ajit Pawar in Action: होम क्वारंटाइन असतानाही अजित पवार ‘इन अॅक्शन’ – home quarantined ajit pawar working from home

मुंबई: थकवा जाणवत असल्यामुळं खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आहेत. घरातूनच त्यांचे कार्यालयीन...

Recent Comments