Home शहरं मुंबई sushant singh rajput suicide: sushant singh rajput : सुशांतची आत्महत्या; 'संभाव्य जॉर्ज'...

sushant singh rajput suicide: sushant singh rajput : सुशांतची आत्महत्या; ‘संभाव्य जॉर्ज’ पडद्याआड गेला: संजय राऊत – shivsena leader sanjay raut reaction on sushant singh rajput suicide


मुंबई: प्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर मला बायोपिक बनवायचा होता. त्यासाठी माझ्यासमोर काही अभिनेत्यांची नावं होती. त्यात सुशांतसिंह राजपूतही होता. पण त्याने आत्महत्या केली. त्यामुळे पडद्यावरचा ‘संभाव्य जॉर्ज’ पडद्याआड गेला, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ( sanjay raut reaction on sushant singh rajput suicide )

संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून सुशांतच्या आत्महत्येवर परखड भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव करणाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. ‘ठाकरे’ चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचे ठरले. जार्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली त्यात सुशांतचे नाव होते. धोनीवरील बायोपिकमुळे तो माझ्या नजरेत होता. तो उत्तम अभिनेता आहे, ही भूमिका लिलया पेलेल असं मला सांगणयात आलं. पण त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. सेटवर त्याचे वर्तन तऱ्हेवाईक आहे. त्याचा त्रास सगळ्यांना होतो. अनेक प्रॉडक्शन हाऊसने याच कारणामुळे त्याच्याशी असलेले करार मोडले. सुशांतने स्वत:च स्वत:च्या करीअरची वाट लावली असे या जाणकारांचे सांगणे होते. त्यानंतर दोन महिन्यातच त्याच्या आत्महत्येची बातमी आली, असं सांगतानाच सुशांतने आत्महत्या केल्याने पडद्यावरचा ‘संभाव्य जॉर्ज’ गेला, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी?; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

यावेळी त्यांनी सुशांतच्या मृत्यूला उत्सवी रुप देणाऱ्यांना झापले. सुशांतची आत्महत्या हे उत्सवाचे एक निमित्त आहे. त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱ्हाळाचा बिंदू आहे, असं सांगतानाच सुशांतच्या आत्महत्येला महिना होत आला तरी प्रसिद्धी माध्यमे त्यावर रकाने भरत आहेत. लॉकडाऊनमुळे चूल कायमची विझली म्हणून पुण्यात पत्नी आणि दोन मुलासह अतुल शिंदे या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची फाइल बंद झाली. सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव होता, पण त्यात शिंद्यांना स्थान नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली. सुशांतचे जाणे सगळ्यांनाच चटका लावून गेले. सुशांत अनंतात विलीन झाला. पण त्याच्या मृत्यूनंतर अनेक थंड पडलेले आत्मे जागे झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

सुशांतच्या आत्महत्येस अचानक उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. सुशांत आत्महत्येचे पाऊल उचलेल अशी आपल्याला शंका होती, असे एका चित्रपट निर्मात्याने जाहीर केले, पण त्याला वाचवण्यासाठी त्याने काय केले? असा सवाल करतानाच देशात करोनाचा कहर, रोज शे-पाचशे लोक करोनाने मरत आहेत. त्यात चिनी आक्रमणाने २० जवानांचे बलिदान झाले. तरीही सुशांतच्या आत्महत्येची बातमी महिनाभर जागा व्यापत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ‘त्या’ २७ जणांचे नोंदवले जबाब

यावेळी त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबाबत काीह उपप्रश्नही उपस्थित केले आहेत. तसेच एखाद्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा उत्सव कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही मार्केटिंग कसे होते, याचे उदाहरण म्हणून सुशांतसिंहच्या प्रकरणाकडे पाहता येईल असे सांगून त्यांनी मीडियानंतर मीडियाने दिलेल्या बातम्यांवरही प्रकाश टाकत टीका केली आहे.

Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दीड वाजता जनतेशी संवाद साधणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Why Anti Love Jihad Law Proposed By UP and MP – ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार कथित 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करणार आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह...

mumbai news News : प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले ‘हे’ सवाल – sachin sawant attacks on bjp over pratap sarnaik...

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयात इडीने केलेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत...

Devendra Fadnavis: BJP Government On Its Own In Maharashtra Soon Says Devendra Fadnavis – Devendra Fadnavis: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; फडणवीसांनी पुन्हा केले...

पंढरपूर: राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान आज विरोधी...

Recent Comments